
Post Office RD Scheme: पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट योजना भारतीय पोस्ट सेवेची लोकप्रिय बचत योजना आहे.ही योजना त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे कमी जोखीमेसह नियमित रुपाने थोडी-थोडी बचत करुन मोठी रक्कम मिळवू इच्छीत आहेत. या योजनेत कोणतीही जोखीम नाही. या योजनेत तुम्हाला वार्षिक 6.7 टक्के रिटर्न मिळतो. यात चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते.
पोस्टाच्या या योजनेत एकाच वेळी एकदर रक्कम गुंतवण्याची गरज नाही. रेकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड SIP सारखी दर महिन्याला छोटी रक्कम जमा करु शकता. पोस्ट ऑफीसमध्ये रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. रिकरिंग डिपॉझिटवर देखील एफडी सारखे व्याज मिळते.तसेच ही योजना दीर्घकाळासाठी गुंतवणूकीला प्रोत्साहन देते.
या योजनेत तुम्हाला वर्षाला 6.7 टक्के रिटर्न मिळते, यात चक्रवाढ व्याज मिळते. म्हणजे तुम्हाला व्याजावर व्याज मिळते. त्यामुळे तुम्ही या योजनेत जर सातत्याने पाच वर्षे प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवले तर तुम्ही एकूण तीन लाख रुपये गुंतवणूक करता. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 3,56,830 रुपये मिळतील. त्यामुळे तुम्हाला या योजनेत एकूण 56,830 रुपयांचा लाभ मिळतो.
गुंतवणूकीच्या दृष्टीने पोस्टाची आरडी योजना चांगली मानली जाते. तुम्ही शंभर रुपये जमा करुन खाते उघडू शकता. कमाल जमा रकमेची कोणतीही मर्यादा नाही. दहा वर्षांच्यावरील अल्पवयीन देखील आपल्या आई-वडीलांच्यासह खाते उघडू शकतो. 18 वर्षांच्या झाल्यानंतर त्याला नवीन केवायसी आणि फॉर्म भरावा लागेल.
परंतू पोस्टाच्या आरडीचा कालावधी पाच वर्षांचा असतो. जर तुम्हा गुंतवणूक करायची असेल तर किमान पाच वर्षे वाट पाहावी लागेल. तुम्ही खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनी बंद देखील करु शकता. जर खातेधारकाचा मृत्यू झाला. तर वारसदार एक तर दावा करु शकतो किंवा खाते पुढे चालवू शकतो. तुम्ही मोबाईल बँकींग किंवा ई-बँकींगद्वारे खाते उघडू शकता.
पोस्ट आवर्ती जमा रकमेवर 6.7% चा निश्चित रिटर्न देते. तुम्ही या योजनेत किमान 100 रुपयांनी गुंतवणूक करु शकता. परंतू 17 लाख रुपयांचा फंड जमा करण्यासाठी तुम्हाला रोज 333 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही महिन्याला दहा हजार रुपये गुंतवले तर तुम्ही काही वर्षात सहज सतरा लाखांचा फंड बनवू शकता.
पोस्टात कोणत्याही जोखमी विना फंड तयार होतो. येथे तुमचा पैसा संपूर्ण सुरक्षित असतो. त्यामुळे गुंतवणूकीसाठी हा चांगला पर्याय आहे. तरीही नीट चर्चा करुन तुम्ही पैसा गुंतवला पाहिजे.
योजनेचे नाव : नॅशनल सेव्हींग्स रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट
कालावधी : 5 वर्षे (ज्यास नंतर 5 वर्षांसाठी आणखी वाढवता येते)
किमान जमा रक्कम : ₹100 प्रति महिना (₹10 रुपयांच्या पटीत )
कमाल जमा रक्कम : कोणतीही मर्यादा नाही.
व्याज दर: सध्या सुमारे 6.7% वार्षिक (तिमाही चक्रवाढ व्याज दर, ज्याचा दर तिमाहीला सरकार आढावा घेते )
सुरक्षा: ही एक सरकारी योजना आहे.यामुळे यात गुंतवलेले पैसे संपूर्णपणे सुरक्षित असतात. आणि यात रिटर्नची गॅरंटी असते.