Post office | पोस्टाच्या ‘या’ बचत योजनेत दर महिन्याला कमाईची संधी 

| Updated on: Jan 10, 2022 | 9:19 AM

पोस्ट खात्याच्या अल्पबचत योजनेत बचत ची बचत ही होते आणि पैसा ही गाठिशी राहतो. यामधील गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित असून ग्राहकाला दर महिन्याला उत्पन्न घेता येते. योजनेत मोठी बचत केल्यास, दर महिन्याला चांगला परतावा मिळू शकतो. तसेच रक्कम ही सुरक्षित राहते. मासिक उत्पन्न योजनेबद्दल माहिती करून घेऊयात.

Post office | पोस्टाच्या या बचत योजनेत दर महिन्याला कमाईची संधी 
post
Follow us on

मुंबई :  गुंतवणूक माणसाला समृद्ध करते. नवीन वर्षात नवीन गुंतवणुकीचा संकल्प सोडला असेल तर गुंतवणुकदार टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. टपाल खात्याच्या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत गुंतवलेला पैसाही पूर्णपणे सुरक्षित असतो. जर बँक दिवाळ खोरीत गेली, ती बुडाली  (Bank Default) तर नुकसान भरपाईपोटी  ग्राहकाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतात. पण पोस्ट ऑफिसमधील (Post Office) योजनेत असे होत नाही.  याशिवाय पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना ती कमी रक्कमेत करता येते. टपाल खात्याच्या मासिक अल्पबचत योजनेत गुंतवणूक फायदेशीर ठरते. या योजनेविषयी जाणून घेऊयात.

व्याजदरही चांगला

टपाल खात्याच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये सध्याच्या घडीला 6.6 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. दरमहिन्याला व्याजदर दिले जाते. हा व्याजदर १ एप्रिल २०२० पासून लागू आहे. इतर ठिकाणी गुंतवणुकीपेक्षा हा व्याजदर चांगला आहे.

गुंतवणूक रक्कम

पोस्ट ऑफिसच्या योजनेत 1000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. एकाच खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम ४.५ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात ९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकदार या योजनेत जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो. यात संयुक्त खात्यातील त्याच्या हिश्शाचा समावेश आहे.  संयुक्त खात्यात एखाद्या व्यक्तीचा हिस्सा (Share) मोजण्यासाठी प्रत्येक सदस्याचा समान वाटा गृहित धरण्यात येतो.

कोण होऊ शकते खातेदार

टपाल खात्याच्या या मासिक उत्पन्न योजनेत, एक प्रौढ, तीन प्रौढ एकत्रित येत संयुक्त खाते उघडू शकतात, अल्पवयीन किंवा भोळसर, गतीमंद व्यक्तीच्या वतीने पालक खाते उघडू शकतात. याशिवाय १० वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीनही स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो.

योजनेचा कालावधी 

या अल्पबचत योजनेत गुंतवणूक सुरु केल्यापासून अर्थात खाते उघडल्यापासून पुढील 5 वर्षांचा कालावधी असतो. त्यानंतर खाते बंद होते. खाते बंद करण्यासाठी पासबुकसह योग्य अर्ज संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावा लागेल. कालावधी पूर्ण होण्याअगोदर खातेधारकाचा  मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि ही रक्कम नामनिर्देशित किंवा कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला परत केल्या जाते. ज्या महिन्यात गेल्या महिन्यापर्यंत परतावा देण्यात आला आहे त्या महिन्यापर्यंत व्याजाचा लाभ मिळेल.

पीपीएफ चा व्याजदर
पोस्ट ऑफिस मधील अल्पबचत योजनेत पीपीएफ ही एक आणखी एक योजना आहे. पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणूक केल्यास सध्या 7.1 टक्के  व्याजदर लागू करण्यात आलेला आहे. दर वर्षी गुंतवणूक रकमेवर कंपाऊंडिंग पद्धतीने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेले आहे. टपाल खात्याच्या अल्पबचत मुदत योजनेअंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये किमान 500 रुपये तर कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकदार सदर रक्कम एक रकमी भरू शकतात अथवा हप्त्याने जमा करू शकतात. टपाल खात्याच्या अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना 15 वर्षे कालावधीची आहे. 15 आर्थिक वर्षांमध्ये पीपीएफ खाते ग्राह्य धरले जाते.  यामध्ये पहिल्या वर्षाची नोंद होत नाही, योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकदारांपुढे पुढील पर्याय असतात. गुंतवणुकदाराला संबंधित योजनेचे पासबुक घेऊन खाते बंद करण्याचा अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधित गुंतवणूकदार सदस्याला मुदत परताव्याची संपूर्ण रक्कम मिळते.

संबंधित बातम्या

Mukesh Ambani | 728 कोटींमध्ये खरेदी केलेलं अंबानींचं न्यूयॉकमधील आलिशान हॉटेल पाहिलात का? भारीच आहे!

तुम्ही कर्ज घेऊ इच्छित आहात? कर्ज घेण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे कर्ज तुमच्यासाठी योग्य ठरेल,आजच जाणून घ्या !!

‘क्रिप्टो’ फर्म ईडीच्या रडारवर: कर नियमांसाठी केंद्राकडे धाव, अर्थसंकल्पात स्पष्टीकरणाची मागणी!