फक्त 5000 बचत करून मिळवा 16 लाख रुपये! लागणार वेळ आणि प्रोसेस समजून घ्या
केवळ 5000 रुपयांची बचत करून तुम्हाला 16 लाख रुपयांचा निधी कसा उभा करता येईल आणि त्यासाठी किती वेळ लागेल, हे सविस्तरपणे जाणून घ्या.

छोटी-छोटी गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम सहज जमा करू शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ( PPF) च्या माध्यमातून हे शक्य आहे. यामाध्यमातून तुम्ही दीर्घकाळात एक मोठा निधी उभारू शकता. यातून तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी चांगली बचत करू शकता. लहान गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही दीर्घ कालावधीत एक उत्तम निधी तुमच्या भविष्यासाठी उभा करू शकता.
आता प्रश्न करतो हे कसं करायचं? तर तुम्ही कोणीही पोस्ट ऑफिसमध्ये 'पब्लिक प्रॉव्हिडंट फंड' (PPF) खाते उघडू शकते. फक्त स्वतःच्याच नाही तर तुम्ही आई-वडील किंवा स्वतःच्या मुलांच्या नावावरही खाते उघडू शकता. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, तुमच्या स्वतःच्या PPF खात्यात आणि तुमच्या मुलाच्या खात्यात मिळून जमा होणारी एकूण वार्षिक रक्कम १.५ लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावी
16 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 5,000 बचत करावी लागेल. भविष्यासाठी दरमहा 5,000 रुपयांची बचत केली, तर ती वर्षाला ६०,००० रुपये होईल. याचाच अर्थ १५ वर्षांच्या कालावधीत, एकूण बचत ९ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.
आता तुम्ही म्हणाल १६ लाख कसे होणार? तर तुम्ही १५ वर्ष केलेल्या बचतीवर ७.१% वार्षिक व्याजदर मिळेल, ज्यावर चक्रवाढ व्याज (compounded interest) आकारले जाईल. यानुसार, १५ वर्षांनंतर ही गुंतवणूक वाढून सुमारे १६.३ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे या गुंतवणुकीत केवळ व्याजातून मिळालेली रक्कम ७ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
तुमच्या मुलाच्या पीपीएफ (PPF) खात्याचा १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर ते बंद करायलाच हवं असं नाही. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही हे खाते ५ वर्षांच्या टप्प्यांत वाढवू शकता आणि एकूण २५ वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवू शकता.
पीपीएफ (PPF) गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात कर सवलती मिळतात. कलम 80C अंतर्गत, तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.