मुकेश अंबानींनंतर D-Mart चे राधाकृष्ण दमानी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

| Updated on: Feb 17, 2020 | 1:59 PM

शेअर बाजार ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि D-Mart रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी (Radhakrishna Damani) हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत

मुकेश अंबानींनंतर D-Mart चे राधाकृष्ण दमानी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती
Follow us on

मुंबई : शेअर बाजार ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि D-Mart रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी (Radhakishan Damani) हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत (India’s second richest person). त्यांचं एकूण उत्पन्न 17.5 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 1,25,000 कोटी रुपये आहे. त्यांनी शि‍व नाडर, गौतम अदाणी यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत ते दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसले आहे (India’s second richest person). देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत, त्यांचं एकूण उत्पन्न 57.4 अरब डॉलर इतकं आहे.

फोर्ब्स रियल टाईम बिलिनियरीज इंडेक्सनुसार, गेल्या आठवड्यात एव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले. त्यामुळे दमानी यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शनिवारी दमानी यांचं उत्पन्न 17.8 अरब डॉलर पर्यंत पोहोचलं. त्यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे श‍िव नाडर (16.4 अरब डॉलर), उदय कोटक (15 अरब डॉलर) आणि गौतम अदाणी (13.9 अरब डॉलर) यांचा क्रमांक लागतो.

मिस्टर व्हाईट म्हणून प्रसिद्ध

राधाकृष्ण दमानी हे नेहमी पांढरं शर्ट आणि पांढरा पँट घालतात आणि त्यांची ही स्टाईल त्यांची ओळख आहे. त्यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. ते शेअर बाजारातील एक प्रसिद्ध जानकार आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवहारी ज्ञानाच्या जोरावर D-Mart ला देशातील यशस्वी रिटेल चेन चालवली.

दमानी हे मीडिया आणि मार्केटिंगपासून दूर राहातात. तसेच, ते सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह नसतात. मार्च 2017 मध्ये एव्हेन्यू सुपरमार्केटचा आयपीओ आल्यानंतर त्यांना रिटेल किंग म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी 2002 मध्ये मुंबईच्या एका उपनगरातून छोटेखानी स्वरुपात या व्यवसायाची सुरुवात केली होती. याशिवाय त्यांनी तंबाकू, बिअर उत्पादन सारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले आहेत. अलीबागच्या 156 खोल्यांच्या ब्लु रेसॉर्टचे ते मालक आहेत.