Raymond Company ज्यांनी उभारली, विजयपत सिंघानिया यांची ही कहाणी

Vijaypat Singhania | विजयपथ सिंघानिया यांनी रेमंडचं साम्राज्य उभं केलं. ते या साम्राज्याचे राजे होते. पण काळाने मोठा घात केला. त्यांचा चांगुलपणा त्यांना भोवला. त्यांच्या मुलानं त्यांना बाहेर हाकलले, असा त्यांचा आरोप आहे. कोर्टकचेरीपर्यंत हा लढा सुरु आहे. आता मुलगा गौतम सिंघानिया यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात ते पुन्हा प्रसिद्धी झोतात आले.

Raymond Company ज्यांनी उभारली, विजयपत सिंघानिया यांची ही कहाणी
| Updated on: Nov 26, 2023 | 10:22 AM

नवी दिल्ली | 26 नोव्हेंबर 2023 : रेमंडचे संचालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील कौटुंबिक कलह चव्हाट्यावर आला आहे. मारहाण, अपमान, पोटगी, घटस्फोट असे अनेक पदर समोर आले आहेत. गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांना मुलाच्या हातात सर्व संपत्ती सोपविल्याचे दुःख होत आहे. ही आपली घोडचूक असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. आपल्या मुलाने आपल्याला घरातून हाकलून दिल्याचे आणि सध्या किरायाच्या घरात आश्रय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता मुलगा सुनेबाबत पण तीच भूमिका घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मुलाने फसवल्याचा आरोप

विजयपत सिंघानिया यांनी बिझनेस टुडेला त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यांनी मुलावर गंभीर आरोप केले होते. सर्व संपत्ती मुलाला दिली. तोच माझा आधार होता. पण त्याने माझे सर्व हिसकावून घराबाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले. थोडीफार मिळकत उरली आहे, त्यावर गुजारण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा असा का वागतो, हे कळत नसल्याचे कोडे त्यांना काही सुटलेले नाही.

कोण आहेत विजयपत सिंघानिया

विजयपत सिंघानिया सध्या 85 वर्षांचे आहेत. ते टेक्सटाईल मॅनेजमेंटमध्ये अनेक वर्षांपासून आहेत. त्यांनी 1944 साली रेमंड समूहाची स्थापना केली होती. त्यांचे वडील एल. के. सिंघानिया यांनी विजयपत यांना मोठी मदत केली होती. अगदी छोट्या मिलपासून रेमंडची सुरुवात झाली होती. आज ही या क्षेत्रातील दादा कंपनी आहे. सिंघानिया यांना अनेक पुरस्कार, पदव्या मिळाल्या आहेत. पद्मभुषण देऊन भारत सरकारने त्यांना सन्मानित केले आहे. 2016 मध्ये सिंघानिया यांनी सर्व शेअर मुलाच्या नावे, गौतम सिंघानिया यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला.

कौटुंबिक कलह चव्हाट्यावर

गौतम सिंघानिया यांनी घरातून बाहेर काढल्याने विजयपत सिंघानिया यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी हा वाद चव्हाट्यावर आला होता. आता गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील वाद जगजाहिर झाला आहे. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली. गौतम यांनी पत्नीशी काडीमोड घेण्याची भूमिका जाहीर केली. तर पत्नीने पतीवर मारहाणीचा दावा केला. या वादात विजयपत सिंघानिया यांनी उडी घेतली आहे. त्यांना संपत्तीतून बेदल केल्याचे प्रकरण गाजले होते. मुलावर ते नाराज आहेत. ते सुनेची साथ देणार आहेत.