100 आणि 200 रुपयांच्या नोटांची मोठी अपडेट, इंटरचेंज फीमध्ये वाढ, RBI च्या आदेशाचा काय परिणाम
आरबीआयने दिलेल्या ३० सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वीच, ७३ टक्के एटीएम आता १०० आणि २०० रुपयांच्या जादा नोटा वितरित करण्यासाठी तयार झाल्या आहेत. आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम दिसून येत आहे.

आरबीआयने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम आता बाजारात दिसत आहे. देशातील ७३ टक्के एटीएममधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटांना भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पाचशे रुपयांच्या नोटांवर गंडांतर येणार हे स्पष्ट झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य लोकांची अडचण पाहून एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची संख्या वाढविण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ ची गाईडलाईन दिली होती. यात आदेशात म्हटले होते की देशातील ७५ टक्के एटीएममधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटा मिळण्याची उपाययोजना करण्यास सांगितले होते. आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागला आहे.
देशात २,१५,००० एटीएमपैकी ७३,००० एटीएमचे संचलन करणारी भारताची सर्वात मोठी रोख व्यवस्थापन कंपनी सीएमएस इन्फो सिस्टीम्सच्यानुसार हे डिसेंबर २०२४ च्या तुलनेत ६५ टक्के वाढ दर्शवित आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, सीएमएस इन्फो सिस्टम्सचे रोख प्रबंधक अध्यक्ष अनुश राघवन यांनी सांगितले की ग्राहकांच्या खर्चाचे ६० टक्के प्रमाण आताही रोखीनेच होत आहे. अशा गावखेड्यात खासकरुन १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची उपलब्धता दिवसेंदिवस देवाण-घेवाण संबंधीच्या गरजा थेट पूर्ण करीत आहे.
RBI ने ATM कॅश डिस्पेंसचे टार्गेट सेट केले
एप्रिल २०२५ अखेरीस जारी केलेल्या परिपत्रकात आरबीआयने सर्व बँकांना आदेश दिला होता की ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत किमान ७५ टक्के एटीएममध्ये किमान एक कॅसेटमधून १०० वा २०० रुपयांच्या नोट्स डिस्पेन्स व्हायला हवेत. या आदेशाचे टार्गेट होते की छोट्या रकमेच्या नोटांचा सर्वसामान्य पब्लिकपर्यंत रिच वाढवणे, ज्या दैनंदिन ट्रान्झंक्शनसाठी यूज होत आहेत. ही रिक्वायरमेंट ३१ मार्च २०२६ पर्यंत आणि स्ट्रीक्ट होणार आहे. तेव्हा ९० टक्के एटीएम्सचा या स्टँडर्डना फॉलो करावे लागणार आहे.
RBI ने ATM इंटरचेंज फी वाढविली
RBI ने ATM इंटरचेंज फी वाढविली आहे. त्यामुळे येत्या १ मे, २०२५ पासून एटीएममधून कॅश काढणे अधिक महाग होणार आहे. यामुळे जे दर महिन्याला फ्री ट्रांक्झंशनची लिमिट क्रॉस करतात त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. इंटरचेंज फी एक बँक दुसऱ्या बँकेला एटीएम ट्राक्झंशन प्रोसेस करण्यासाठी पे करीत असतात. आणि याचा भार अखेर युजरवर टाकला जातो. उदाहरणार्थ एचडीएफसी बँकेचा युजर तीन महिने फ्री टांक्झशन प्रोसेस केल्यानंतर एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढतो तेव्हा एचडीएफसीला एक्स्ट्रा विड्रॉलसाठी फि चार्ज करु शकतो..
