
AC-Refrigerator Price Hike: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका बसणार आहे. ब्यूरो ऑफ एनर्जी एफिसिएन्सीने (BEE) स्टार रेटिंग नियम अत्यंत कडक केले आहे. त्यामुळे न्यू 5 स्टार AC, फ्रिज, कुलर वा इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार आहे. PTI च्या वृत्तानुसार, 1 जानेवारी 2026 रोजी BEE चे स्टार रेटिंग नियम लागू होत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे नियम लागू झाले आहेत. BEE स्टार रेटिंगच्या नवीन नियमानुसार,एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरच्या किंमतीत 5 ते 10 टक्क्यांपर्यंत किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्याचा चाकरमान्यांसह सर्वसामान्य ग्राहकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यांना या वस्तू खरेदीसाठी खिसा खाली करावा लागणार आहे.
GST मुळे कमी झाल्या होत्या किंमती
गेल्या सप्टेंबर महिन्यात GST कपातीनंतर AC च्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. आता नवीन BEE स्टार नियम लागू झाल्यानंतर किंमती पुन्हा वाढतील. कदाचित जुन्याच किंमती लागू होतील. चार ते पाच महिन्यांपूर्वी जे भाव होते, त्याच दरात या वस्तू खरेदी कराव्या लागतील.
BEE स्टार रेटिंग म्हणजे काय?
AC, फ्रिज, टिव्ही वा वॉशिंग मशीनवर स्टार रेटिंग देण्यात येते. 5-स्टार रेटिंगमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू किती वीज वापरतात, त्यांच्यामुळे किती वीज बिल येते हे समोर येते. 1 स्टार असेल तर त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अधिक वीज वापरतात. तर ज्या वस्तूंना 5 स्टार रेटिंग असते. त्यांचे विद्युत बिल अगदी कमी येते. बीईई स्टार रेटिंगमुळे हा विद्युत बिल कमी होईल हे मात्र निश्चित आहे.
AC, फ्रिजच्या का वाढत आहेत किंमती?
BEE च्या नवीन एनर्जी एफिशिएन्सी नियम लागू झाले
डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाली
तांबे आणि इतर कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी उसळी
नवीन कडक नियम आणि वीज बिल कमी येण्यासाठीच्या उपाययोजना
BEE स्टार रेटिंग नियम बदलल्यामुळे आता युझर्सला अधिक फायदा होईल. त्यांचे वीज बिल कमी होईल. आता न्यू 5 Star AC जुन्या 5 स्टार एसीच्या तुलनेत अधिक ऊर्जा बजत करतील. त्यामुळे विद्युत बिल कमी येईल. 2025 मध्ये जे 5 स्टार रेटिंगची इलेक्ट्रॉनिक वस्तू होती. ती नवीन वर्षात 2026 मध्ये 4 स्टार रेटिंगची मानण्यात येईल.