रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार, रिलायन्स पॉवर 1325 कोटींचे शेअर्स, वॉरंट जारी करणार

| Updated on: Jun 14, 2021 | 12:30 PM

13 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रिलायन्स पॉवर 10 रुपयांच्या इश्यू प्राईसने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 59.5 कोटी इक्विटी शेअर्स देईल. तसेच 73 कोटी रुपयांचे वॉरंटसही इश्यू करण्यात आले आहेत.

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार, रिलायन्स पॉवर 1325 कोटींचे शेअर्स, वॉरंट जारी करणार
अनिल अंबानी
Follow us on

मुंबई: अनिल अंबानी समूहातील रिलायन्स पॉवर या कंपनीकडून Reliance Infrastructure कंपनीला 1325 कोटी रुपयांचे शेअर्स आणि वॉरंट जारी करण्यात येणार आहे. यामध्ये 59.5 कोटी प्रिफेन्शियल शेअर्सचा समावेश आहे. रिलायन्स पॉवरकडून रविवारी शेअर बाजार नियमकांना याबद्दलची माहिती देण्यात आली. (Relaince power to issue of shares warrents worth rs 1325 crores to Infra)

13 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रिलायन्स पॉवर 10 रुपयांच्या इश्यू प्राईसने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 59.5 कोटी इक्विटी शेअर्स देईल. तसेच 73 कोटी रुपयांचे वॉरंटसही इश्यू करण्यात आले आहेत.

त्यामुळे रिलायन्स पॉवरच्या डोक्यावरीक कर्जाचा भार 1325 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. चालू आर्थिक वर्षात रिलायन्स पॉवरचे एकत्रित कर्ज 3200 कोटी रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तसेच नव्या समभागांमुळे रिलायन्स पॉवर कंपनीत रिलायन्स इन्फ्रा आणि अन्य प्रवर्तकांची भागीदारी 25 टक्क्यांपर्यंत वाढेल. रिलायन्स इन्फ्राच्या आठ लाख शेअरधारकांना याचा फायदा मिळणार आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी पैसा वापरणार

6 जून रोजी रिलायन्स इन्फ्राच्या संचालक मंडळाने प्रिफेंशियल समभागांच्या माध्यमातून 550.56 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या पैशांचा उपयोग दीर्घकालीन गुंतवणूक आणि कर्ज कमी करण्यासाठी होईल.

इतर बातम्या:

शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले

अदानी ग्रुपचं मोठं पाऊल, 48 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार!

अंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत

(Relaince power to issue of shares warrents worth rs 1325 crores to Infra)