Reliance फाऊंडेशनने केंद्राकडे Johnson & Johnson लस आयात करण्याची मागितली परवानगी

| Updated on: Jun 04, 2021 | 11:20 PM

रिलायन्स फाऊंडेशनने अमेरिकेतील जॉन्सन आणि जॉन्सन व्हॅक्सिन या अमेरिकन कंपनीच्या लसीकरण आणि देशातील अंतर्गत वापरासाठी 20 लाख डोसची आयात करण्याची सरकारकडे परवानगी मागितली. Reliance Foundation Johnson & Johnson vaccine

Reliance फाऊंडेशनने केंद्राकडे Johnson & Johnson लस आयात करण्याची मागितली परवानगी
Follow us on

नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजची परोपकारी संस्था रिलायन्स फाउंडेशनने आपल्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी जॉन्सन आणि जॉन्सन लसीचे डोस आयात करण्यास सरकारकडे परवानगी मागितली. रिलायन्स फाऊंडेशनने अमेरिकेतील जॉन्सन आणि जॉन्सन व्हॅक्सिन या अमेरिकन कंपनीच्या लसीकरण आणि देशातील अंतर्गत वापरासाठी 20 लाख डोसची आयात करण्याची सरकारकडे परवानगी मागितली. (Reliance Foundation seeks permission to import Johnson & Johnson vaccine)

जॉन्सन आणि जॉन्सनकडून आयात केलेली लस केवळ कंपनीमध्येच वापरली जाणार

सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी नुकत्याच झालेल्या संवादात रिलायन्स फाऊंडेशनने ही माहिती दिलीय. जॉन्सन आणि जॉन्सनकडून आयात केलेली लस केवळ कंपनीमध्येच वापरली जाईल आणि ती व्यावसायिक हेतूंसाठी वापरली जाणार नाही. भविष्यात इतर लस उत्पादकांकडून लस आयात करण्याची शक्यताही शोधू शकतो आणि ती केवळ अंतर्गत कारणांसाठी वापरली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

2010 मध्ये रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना 2010 मध्ये आरआयएलच्या विविध परोपकारी उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी केली गेली. फाऊंडेशनने सरकारला सांगितले आहे की, या अभूतपूर्व साथीच्या वेळी कोविड 19 रुग्णालये आणि केअर सेंटर स्थापन करून विनामूल्य जेवण पुरवून समाजाला दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत.

..तर ही लस संस्थेमध्ये वापरली जाणार

रिलायन्स फाऊंडेशनने मंत्रालयाला दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स फाऊंडेशन जॉन्सन आणि जॉन्सनची कोविड 19 ही लस अमेरिकेहून मर्यादित वापराच्या उद्देशाने आणि आमच्या कर्मचार्‍यांच्या लसीकरण आणि अंतर्गत वापरासाठी वापरली जात आहे. ही लस केवळ व्यावसायिक उद्देशाने नव्हे तर केवळ संस्थेमध्ये वापरली जाईल.

संबंधित बातम्या

अंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत

PMSBY Scheme संदर्भात शनिवारी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची बैठक, काय होणार बदल?

Reliance Foundation seeks permission to import Johnson & Johnson vaccine