Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! 15 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अनलिमिटेड 5G डेटा अन्…; जाणून घ्या डिटेल्स

Reliance Jio ₹15 Plan: जिओचा सर्वात स्वस्त आणि गेम-चेंजर प्लॅन आला आहे. अवघ्या १५ रुपयांत अमर्यादित ५जी (5G) डेटा आणि इतर काय काय सुविधा आहेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या.

Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! 15 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार अनलिमिटेड 5G डेटा अन्...; जाणून घ्या डिटेल्स
Jio Cheapest Recharge plan
| Updated on: Nov 06, 2026 | 9:44 AM

Reliance Jio ₹15 Plan: रिलायन्स जिओने गेल्या काही काळापासून त्यांच्या रिचार्जची किंमत फार वाढवली आहे. त्यामुळे जिओ युजर्स सध्या जिओचा कधी कोणता स्वस्त प्लॅन येतोय याकडे लक्ष ठेवून असतो. अशातच आता जिओने 15 रुपयांचा नवीन ‘अनलिमिटेड 5G डेटा पॅक’ लाँच केला आहे. या फक्त 15 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. एकंदरीत हा प्लॅन अनेकांच्या फायद्याचा आहे. तर या प्लॅनमध्ये २४ तासांसाठी अमर्यादित हाय-स्पीड 5G डेटा मिळतो. या पॅकच्या मदतीने युजर्स व्हिडीओ पाहू शकतात, ऑनलाइन गेम्स खेळू शकतात आणि मोठ्या फाइल्सही सहज डाउनलोड करू शकतात. तसेच, याचा वापर रिमोट वर्क अर्थात वर्क फ्रॉम होम करण्यासाठीही केला जाऊ शकतो. या प्लॅन अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना काहीच कालावधीसाठी जास्त डेटा हवा आहे. सामान्य डेटा ॲड-ऑन पॅकमध्ये डेटाची एक निश्चित मर्यादा असते, परंतु हा पॅक २४ तासांपर्यंत अनलिमिटेड 5G डेटा तुम्हाला देणार आहे.

‘हा’ प्लॅन कसा आहे फायदेशीर?

या अवघ्या १५ दिवसाच्या रिचार्ज पॅकच्या मदतीने युजर्स 4K व्हिडीओ स्ट्रीम करू शकतात. याशिवाय तुम्ही सहज थेट क्रीडा सामने पाहू शकतात आणि मल्टीप्लेअर गेम्स खेळू शकतात. तसेच, याचा वापर मोठ्या फाइल्स अपलोड करण्यासाठी आणि फोनमधील डेटा क्लाउडवर बॅकअप घेण्यासाठीही केला जाऊ शकतो. एवढंच नाही तर युजर्स मोबाईल हॉटस्पॉटद्वारे लॅपटॉप आणि टॅब्लेट कनेक्ट करू शकतात. यामुळे इंटरनेट ब्राउझिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि घरून काम करणे सोपे होईल. यासाठी 5G-सक्षम स्मार्टफोनची आवश्यकता असेल.

Loading...

रिचार्ज प्लॅनबद्दल अधिकची माहिती

जिओचा हा पॅक फक्त १५ रुपयांत उपलब्ध असून याची वैधता २४ तासांची आहे. यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. महत्त्वाचं म्हणजे कंपनीने हा पॅक देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध करून दिला आहे.

कुठून करायचा रिचार्ज?

युजर्स ‘मायजिओ’ (MyJio) ॲप किंवा Jio.com च्या माध्यमातून सहज हा रिचार्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, हा पॅक रिलायन्स रिटेल आउटलेट्स, लोकल दुकाने आणि थर्ड-पार्टी रिचार्ज प्लॅटफॉर्मवरूनही खरेदी करता येईल. तसेच, तो जिओच्या एंटरप्राइझ वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

रिचार्ज वापरासाठी ‘हे’ सगळ्यात महत्त्वाचं!

अमर्यादित ५जी डेटाचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे ५जीचे नेटवर्क चालत असलेला स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. यासोबतच, तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तिथे जिओचे ५जी नेटवर्क उपलब्ध असणे गरजेचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us