iPhone सोबत श्रीमंत व्हा! महागडा स्मार्टफोन खरेदीपेक्षा हा मल्टिबॅगर स्टॉक निवडा, मग चमत्कार पाहा

Apple iPhone 17 : महागडा आयफोन खरेदी करण्यापेक्षा ही गुंतवणूक तुम्हाला मालामाल करेल. आयटी आणि टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स देणाऱ्या या कंपनीकडे मोबाईल पुरवठा साखळीचे व्यवस्थापन आहे. या कंपनीचा शेअर सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे.

iPhone सोबत श्रीमंत व्हा! महागडा स्मार्टफोन खरेदीपेक्षा हा मल्टिबॅगर स्टॉक निवडा, मग चमत्कार पाहा
व्हा श्रीमंत
| Updated on: Sep 17, 2025 | 2:36 PM

Redington India Multibagger Stock : ॲप्पल कंपनीने 9 सप्टेंबर रोजी आयपोन 17 सीरीज लाँच केली. त्याची विक्री 19 सप्टेंबरपासून जगभरात सुरू होईल. आयटी आणि टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स सेवा पुरवठादार रेडिंगटन इंडिया लिमिटेड या कंपनीकडे मोबाईल पुरवठा साखळीचे व्यवस्थापनाचे काम आहे. यामध्ये Apple आणि Samsung या मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे. सध्या रेडिंगटन इंडिया लिमिटेडच्या शेअर्समधये तुफान तेजी दिसून येत आहे. मंगळवारी इंट्रा डे सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने जोरदार तेजी दाखवली.

289 रुपयांवर शेअर

या कंपनीचा शेअर 19 टक्क्यांच्या उसळीसह 289 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचला. मंगळवारी बीएसईवर रेडिंगटन इंडियाने जवळपास 75 लाख शेअर्सचा व्यापारी उलाढाल केली. तर एनएसईवर 9.20 कोटी शेअर्सची व्यापारी उलाढाल दिसली. एकूण, मंगळवारी व्यापार झालेल्या शेअर्सची संख्या गेल्या दोन आठवड्यांच्या सरासरीपेक्षा 120 पट अधिक होती.

iPhone 17 शी काय संबंध?

रेडिंगटन इंडिया लिमिटिडेच्या शेअर्समध्ये अचानक इतकी तेजी का आली असा सवाल अनेकांना पडला आहे. त्याचे आयफोन 17 सीरीजशी असलेल्या कनेक्शनमुळे ही तेजी आल्याचे समोर येत आहे. आयफोन 17 ची विक्री जसजसी जवळ येत आहे, तसतशी शेअरमध्ये तेजी आल्याचे दिसून येते.

आयटी आणि टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स सेवा पुरवठादार रेडिंगटन इंडिया लिमिटेड या कंपनीकडे मोबाईल पुरवठा साखळीचे व्यवस्थापनाचे काम आहे. यामध्ये Apple आणि Samsung या मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे. रेडिंगटनने 2007 मध्ये Apple Mac सिस्टम आणि 2011 मध्ये iPhone च्या वितरणासाठी Apple सोबत एक करार केला. iPhone 17 मॉडल लाँच आणि विक्री सुरू करण्याच्या वृत्तादरम्यान गुंतवणूकदारांचे लक्ष या कंपनीने स्वतःकडे वेधले.

शेअरची दमदार कामगिरी

रेडिंगटन इंडिया लिमिटेडच्या शेअर्सचा 52 आठवड्यातील उच्चांक 334.80 तर निच्चांक 156.81 रुपये इतका होता. या शेअरने निच्चांकापासून आतापर्यंत 80 टक्क्यांची उसळी घेतली आहे. एका वर्षांत या शेअरने 51 टक्के तर 5 वर्षांत या शेअरमध्ये 382 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मार्च 2025 मध्ये या कंपनीला तिमाहीत निव्वल 918 कोटींचा नफा झाला.

डिस्क्लेमर : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या.