मुकेश अंबांनीकडे आहेत जगातील या 5 महागड्या वस्तू; 5 वी गोष्ट सर्वात खास

मुकेश अंबानी, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, त्यांच्याकडे जगातील 5 अत्यंत महागड्या वस्तू आहेत. यात भव्य अँटिलिया, आलिशान जेट, बुलेटप्रूफ BMW कार, शानदार याच आणि नीता अंबानींसाठीची खास मेबॅक 62 यांचा समावेश आहे. त्यांची एकूण $79.6 बिलियनची संपत्ती कठोर परिश्रमाचे फळ आहे.

मुकेश अंबांनीकडे आहेत जगातील या 5 महागड्या वस्तू; 5 वी गोष्ट सर्वात खास
mukesh ambani
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 11:50 PM

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी हे केवळ भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत, तर आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे सुमारे 79.6 बिलियन डॉलरची नेटवर्थ आहे. फोर्ब्सच्या यादीतही त्यांचा दरवर्षी समावेश असतो. त्यांची नेटवर्थ ही दरवर्षी वाढतच असते. अत्यंत कठोर मेहनत, शिस्तबद्धता याच्या जोरावर त्यांनी आपली संपत्ती वाढवली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे जगातील पाच महागड्या वस्तू आहेत. त्या क्वचितच कुणाकडे असतील. यातील पाचवी वस्तू तर अत्यंत खास आणि अनमोल अशीच आहे.

अँटिलिया :

Loading...

तब्बल 2 बिलियन डॉलर खर्च करून अँटिलिया इमारत बांधण्यात आलीय. ही 27 मजली इमारत आहे. जगातील दुसरी सर्वात महागडी इमारत म्हणून अँटिलियाकडे पाहिलं जातं. बकिंघम पॅलेसनंतर अँटिलियाचा नंबर येतो. ही जगातील सर्वात महागडी खासगी निवासी संपत्ती आहे.

या घरात सुमारे 600 कर्मचारी काम करतात. घराची 24 तास देखभाल करतात. घरात हेल्थ स्पा, एक सलून, एक बॉलरूम, 3 स्विमिंग पूल, योगा आणि डान्स स्टुडिओ आहेत. या इमारतीचे सुरुवातीचे सहा मजले केवळ पार्किंगसाठी बनवण्यात आले आहेत. या घरात एक प्रायव्हेट थिएटर आणि स्नो रुमही आहे.

एअर बस 319 जेट :

मुकेश अंबानीकडे स्वत:चं एअर बस 319 कार्पोरेट जेट आहे. या विमानातून 25 प्रवाशी प्रवास करू शकतात. या प्लेनमध्ये एक मोठी एंटरटेन्मेंट केबिन, लग्जरी स्काय बार आणि फॅ्सी डायनिंग एरिया आहे. हे विमान 100 मिलियन डॉलरचं असल्याचं सांगितलं जातं. या जेटमध्ये लेदर सीटिंग, एअर कंडिशन्ड आणि खास कॉकपिट आहे. अंबानींकडे याशिवाय दोन इतर खासगी विमान बोइंग बिजनेस जेट -2 आणि फॉल्कन 900EX ही आहे.

बीएमडब्ल्यू 760i (BMW 760Li ) :

मुकेश अंबानी BMW760Li या बुलेटप्रुफ कारने प्रवास करतात. यात बोर्ड कॉन्फरन्स सेंटर, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीन लावण्यात आली आहे. मुकेश अंबानी प्रत्येक ठिकाणी याच गाडीतून फिरतात. या कारची बेस प्राइज 300,000 डॉलर आहे. पण तिच्या आर्म्ड एडिशनची किंमत 1.4 मिलियन डॉलर आहे. मुकेश अंबानींची ही बीएमडब्ल्यू कार मुंबईतील सर्वात महागड्या रजिस्ट्रेशनपैकी एक आहे. तसेच सर्वात महागडी कार ठेवणारे अंबानी हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत.

याच :

मुकेश अंबानी यांच्याकडे एक याचही. याची किंमत सुमारे 1 मिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. 58 मीटर लांब आणि 38 मीटर रुंद या याचमध्ये सोलर ग्लास रूफ लावण्यात आलेली आहे. यात सर्व सुविधायुक्त तीन डेक आहेत. पियानो बार, लॉन्ज आणि डायनिंग एरिया यात आहे. यात पाहुण्यांसाठी पर्सनल सूट आणि रिडिंग रुमही आहेत. समुद्रात एखाद्या लग्जरी घरासारखा फिल हे याच देत असतं.

मेबॅक 62 :

पत्नीसाठी मेबॅक 62 खरेदी करणारे मुकेश अंबानी हे एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी ही कार भेट दिली होती. या कारचा वेग ताशी 250 किमी इतका आहे.

ही कार केवळ 5.4 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर धावते. एक मिलियन पेक्षा अधिक किमतीची ही कार अंबानी यांच्यासाठी खास आहे. या कारशिवाय अंबानी यांच्याकडे एस्टन मॉर्टिन, मर्सडीज एस क्लास आणि इतर लग्जरी कारेही आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us