मोठ्या परताव्यासह टॅक्समध्येही बचत, या 5 बँकात FD वर मिळतेय 7.5% पर्यंत व्याज

Top 5 Tax Saving bank FDs: बँकांमध्ये एफडी योजनेत पैसा गुंतवणूक सोपे आणि सुरक्षित मानले जाते. या एफडी योजनेत कर सवलत देखील मिळते.

मोठ्या परताव्यासह टॅक्समध्येही बचत, या 5 बँकात FD वर मिळतेय 7.5% पर्यंत व्याज
Top 5 Tax Saving bank FDs
| Updated on: Oct 29, 2026 | 10:02 PM

देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या एफडी योजना सादर करतात. लोक आपल्या गुंतवणूकीची सुरक्षा आणि परताव्याचा फायदा पाहून संबंधित बँकांच्या एफडीची निवड करतात. एफडीला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. ज्या लोकांना निश्चित व्याजदरासह सुरक्षित गुंतवणूकीवर ठरलेल्या वेळी रिटर्नची गरज असते, ते बँक एफडीच्या पर्यायावर विचार करतात आणि एक्सपर्टचा सल्ला किंवा खूप विचाराअंती पैशांची गुंतवणूक करतात.

येथे आपण टॉप – ५ टॅक्स सेव्हींग बँक एफडीची माहिती घेऊयात, ज्या पाच वर्षात ७.५ टक्के व्याजदराने रिटर्न देऊ शकतात. यांच्या रिटर्नवर ८० सी अंतर्गत टॅक्स मधून सुट देखील मिळते. जर एखाद्याने एक रकमी १० हजार रुपयांची एफडी करत असेल तर त्याला मॅच्युरिटीनंतर पाच वर्षांनी किती अंदाजित रिटर्न मिळेल.

Loading...

 

टॉप 5 टॅक्स सेव्हिंग बँक एफडी कोणत्या ?

आपण येथे टॉप – ५ टॅक्स सेव्हींग बँक एफडीवर बोलत आहोत. सुरुवात आपण येस बँकेपासून करणार आहोत. ऐस बँक एफडीवर पाच वर्षात ६.८ टक्के व्याज देते. तसेच जे एंड के बँक देखील ६.८ टक्के वार्षिक व्याज देते.

तर आयडीएफसी फर्स्ट बँक आणि सिटी युनियन बँक देखील आपल्या पात्र गुंतवणूकरांना पाच वर्षांत टॅक्स सेव्हींग एफडीवर वार्षिक ६.८ टक्के व्याज देते. या शिवाय डीसीबी बँक देखील एफडीवर ७.५ टक्क्यांनी व्याजदराने रिटर्न देते.

टॅक्स सेव्हींग एफडीत १० हजार ५ वर्षात किती होतील ?

आता आपण जाणून घेऊयात की टॅक्स सेव्हींग एफडी मध्ये १० हजार रुपये पाच वर्षांत किती होतात. याला खाली दिलेल्या टेबलमध्ये वाचूयात…

बँकेचे नाव व्याज दर (%)रु. 10,000 वाढून किती होईल (₹)
डीसीबी बँक7.514,499
सिटी यूनियन बँक6.813,975
आयडीएफसी फर्स्ट बँक6.813,975
जम्मू एंड काश्मीर बँक6.813,975
यस बँक6.813,975

येथे लक्ष देणारी गोष्ट म्हणजे या आकड्यांना कोणा विशेष बँकेत पक्की मॅच्युरिटी रक्कम मानू नये. अंतिम मॅच्युरिटी रक्कम येथे दाखवलेल्या आकड्यांपेक्षा वेगळी देखील असू शकते. यासाठी १० हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळणारी अचूक मॅच्युरिटी रक्कम जाणून घेण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क करणे चांगले होईल.

टॅक्स सेव्हिंग बँक एफडीचा अर्थ काय असतो?

टॅक्स सेव्हिंग बँक एफडीचा अर्थ जमा रक्कमेवर व्याज वा रिटर्नवर टॅक्समध्ये काही सुट मिळणे होय.

एफडीला मराठीत काय म्हणतात ?

एफडीला मराठीत ( फिस्क्ड डिपॉझिट ) म्हटले जाते.

डीसीबी बँक टॅक्स सेव्हींग एफडीवर किती व्याज देते ?

डीसीबी बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर ७.५ टक्के व्याज देते.

एफडीला एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते का ?

एक्सपर्ट्सच्या मते , एफडीला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.

कमीत कमी किती दिवसांची एफडी करता येते ?

कमीत कमी 7 दिवसांची एफडी करता येऊ शकत.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us