SBI च्या एफडीवर मिळतोय जास्त फायदा, व्याज दरामध्ये आणखी केली वाढ

| Updated on: Jan 12, 2021 | 3:58 PM

एफडीच्या या प्रकारामध्ये, बँक ग्राहकांना 5 प्रकारच्या निश्चित ठेव योजना देत आहे. या योजनांमध्ये कमी गुंतवणुकीवर तुम्ही चांगला परतावा आणि फायदा मिळवू शकता.

SBI च्या एफडीवर मिळतोय जास्त फायदा, व्याज दरामध्ये आणखी केली वाढ
स्टेट बँक ऑफ इंडिया
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाच्या भीषण काळानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना आणखी नफा देण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) च्या एक उत्तम पर्याय निवडला आहे. यामध्ये चांगली कमाई म्हणजे एफडीवरील परतावा. मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय ग्राहकांना एफडीवर चांगला परतावा देत आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त नफा मिळणार आहे. म्हणजेच जास्त व्याज दर, ज्यामुळे ठेवीच्या भांडवलावर मिळणारी रक्कमही मोठी होते. एफडीच्या या प्रकारामध्ये, बँक ग्राहकांना 5 प्रकारच्या निश्चित ठेव योजना देत आहे. या योजनांमध्ये कमी गुंतवणुकीवर तुम्ही चांगला परतावा आणि फायदा मिळवू शकता. (saving idea sbi increased fd interest rate hikes interest rates for senior citizens)

आता यामध्ये बँकेने कोणत्या व्याज दरांमध्ये बदल केले आहेत आणि दोन कोटीपेक्षा कमी घरगुती ठेवींसाठी किती व्याज मिळतं याबद्दल तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य योजनेपेक्षा ज्येष्ठ नागरिकांचं व्याज दर हे थोडं जास्त आहे. त्यासंबंधी महत्त्वाचा तपशील इथे देण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार जास्त व्याज

बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येकवर्षी 7 दिवस ते 45 दिवसांसाठी 3.30 टक्के व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.80 आहे. 46 ते 179 दिवसांदरम्यान, सामान्य नागरिकांना 4.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांनाही त्याच दराने बँकेकडून व्याज मिळेल. 180 ते २१० दिवसांसाठी सामान्य नागरिकांना 4.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.30 टक्के व्याज मिळेल. 211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकाला 5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.30 टक्के व्याज मिळेल.

काय आहे व्याज दर ?

1 ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के व्याज मिळते. 2 ते 3 वर्षामध्ये सामान्य नागरिकांना 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6 टक्के व्याज तर 3 ते 5 वर्षे सामान्य नागरिकाला 5.70 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के व्याज मिळेल. 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत सामान्य नागरिकाला 5.70 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकाला 6.50 टक्के व्याज मिळते. हे व्याज दर दोन कोटींपेक्षा कमी रकमेच्या देशी ठेवींसाठी आहेत. (saving idea sbi increased fd interest rate hikes interest rates for senior citizens)

संबंधित बातम्या – 

‘या’ अ‍ॅपच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस RD अकाऊंटमध्ये जमा करा ऑनलाईन पैसे; घरबसल्या होणार काम

SBI, PNB आणि AXIS बँकेनं व्याजदर बदलले, जाणून घ्या कुठे मिळतो FD वर जास्त फायदा

 

(saving idea sbi increased fd interest rate hikes interest rates for senior citizens)