शेअरचा दम, अजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे घेतले SBI चे शेअर, आता किंमत पाहून बसेल धक्का

| Updated on: Apr 08, 2024 | 12:53 PM

share investment: डॉक्टर डॉ. तन्मय मोतीवाला यांनी म्हटले की, एसबीआयचे हे फिजिक शेअर मी डिमॅटमध्ये परिवर्तित केले. ही खूप दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी सल्लागाराची मदत घेणे गरजेचे आहे. मोतीवाला यांच्या पोस्टवर अनेक कॉमेंट आल्या आहेत.

शेअरचा दम, अजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे घेतले SBI चे शेअर, आता किंमत पाहून बसेल धक्का
डॉक्टर डॉ. तन्मय मोतीवाला यांचे ट्विट
Follow us on

शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर असते. विचारपूर्वक चांगल्या कंपन्यांमध्ये दिर्घकालीन केलेली गुंतवणूक मोठा फायदा मिळवून देते. हा फायदा किती पट असू शकतो? याचा अंदाज कधी कधी लावणे अवघड आहे. छत्तीसगढमधील जगदलपूर येथील एका डॉक्टराला भारतीय स्टेट बँकेच्या शेअरच्या माध्यमातून लॉटरीच लागली आहे. डॉ. तन्मय मोतीवाला यांच्या अजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे SBI चे शेअर घेतले होते. आता त्याची किंमत 750 पट वाढली आहे. त्यांचे 500 रुपयांचे 3 लाख 75 हजार झाले आहेत. त्यात वेळवेळी मिळालेला लाभांशचा समावेश केलेला नाही. ही रक्कम खूप मोठी नसली तरी 30 वर्षांत 750 पट रिटर्न या शेअरने दिला आहे. यासंदर्भातील ट्विट डॉ. तन्मय मोतीवाला यांनी केले आहे. ते चांगलेच व्हायरल झाले आहे.

काय आहे ट्विट

डॉक्टर डॉ. तन्मय मोतीवाला बालरोग तज्ज्ञ आहेत. 1994 मध्ये त्यांच्या अजोबांनी भारतीय स्टेट बँकेचे ₹ 500 शेअर घेतले होते. ते शेअर घेऊन ते विसरुन गेले होते. एकेदिवशी डॉ. तन्मय मोतीवाला यांना त्या शेअरचे प्रमाणपत्र मिळाले. त्यांनी त्याचे आजची रक्कम पाहिली असता 750 पट रिटर्न मिळाले आहे. यामुळे त्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. ती चांगलीच व्हायरल झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अनेकांनी केल्या कॉमेंट

डॉक्टर डॉ. तन्मय मोतीवाला यांनी म्हटले की, एसबीआयचे हे फिजिक शेअर मी डिमॅटमध्ये परिवर्तित केले. ही खूप दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी सल्लागाराची मदत घेणे गरजेचे आहे. मोतीवाला यांच्या पोस्टवर अनेक कॉमेंट आल्या आहेत.

अनेकांनी आपले अनुभव शेअर केले आहे. एक जण म्हणतो, माझ्याकडे एक हजार रुपयांचे घेतलेले रिलायन्सचे शेअर होते. आज त्याची किंमत 4 लाख झाली आहे. काही जणांनी आपल्याकडे असे फिजिकल शेअर असल्याचे म्हटले आहे. एक युजर म्हणतो, गुंतवणूक करुन विसरुन जावे, हा चांगला फंडा आहे. त्यामुळे खूप वर्षांनी खूप चांगली रक्कम मिळते.