Penny Stock : चार आणे नाही कर्ज, 250 टक्क्यांची झेप, शेअर खरेदीसाठी उडाली झुंबड

Debt Free Kashyap tele : या कंपनीचा शेअर महिन्याभरात 7 टक्क्यांनी तर 6 महिन्यात 107 टक्क्यांनी आणि एका वर्षात 232 टक्क्यांनी वधारला. पाच वर्षांत या शेअरने 700 टक्क्यांची कमाई करून दिली. हा पेनी स्टॉक आहे. ही कंपनी कर्जमुक्त आहे.

Penny Stock : चार आणे नाही कर्ज, 250 टक्क्यांची झेप, शेअर खरेदीसाठी उडाली झुंबड
छपाई आणि कमाई
| Updated on: Sep 30, 2025 | 4:34 PM

कश्यप टेली मेडीसीनचे शेअर (Kashyap tele medicines) सध्या सातत्याने चर्चेत आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी तेजी दिसली. आज हा शेअर व्यापारी सत्रादरम्यान 3 टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर 9.83 रुपयांवर गेला. विशेष म्हणजे या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. ही कंपनी कर्जमुक्त आहे. यंदा या शेअरने आतापर्यंत 250 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या दरम्यान हा शेअर 2.89 रुपयांहून वाढून 9.83 रुपयांवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली. या कर्जमुक्त कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

शेअरचा चढता आलेख

कश्यप टेली मेडीसीनचा शेअर या महिन्यात 7 टक्क्यांनी, 6 महिन्यात 107 टक्क्यंनी तर एका वर्षात 232 टक्क्यांनी वधारला. गेल्या 5 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, या शेअरने 700 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या दरम्यान या शेअरची किंमत 2 रुपयांहून थेट 9 रुपयांच्या घरात पोहचली. कंपनीच्या शेअरचा 52 अठवड्यातील उच्चांक 10.22 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 1.43 रुये इतका आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 46.86 कोटी रुपये आहे. या कंपनीवर सध्या कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही. कंपनी पूर्णतः कर्जमुक्त आहे.

कंपनीचा व्यवसाय काय?

कश्यप टेली मेडीसीन लिमिटेडची (यापूर्वी जिंदल ऑनलाईन नाव) स्थापना 20 फेब्रुवारी,1995 रोजी झाली होती. डॉ. यमुनादत्त अग्रवाल यांनी या कंपनीची स्थापना केली. ही भारतीय कंपनी आहे. ही कंपनी आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते. सध्या कंपनी आरोग्य, आर्थिक सेवा आणि इतर उद्योगांना तांत्रिक मदत करते. त्यांच्या अडचणी सोडवते. ही कंपनी BSE वस सूचीबद्ध आहे. ही कंपनी छोट्या आयटी क्षेत्रात मोडते.

संरक्षण कंपनीला मोठी ऑर्डर

तर भारत सरकारची नवरत्न संरक्षण कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) कंपनीच्या शेअरमध्ये आज 1 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीला 1092 कोटींची नवीन ऑर्डर मिळाल्याचा परिणाम दिसून आला. येत्या काही दिवसात हा शेअर झेप घेण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.