PNB ग्राहकांना धक्का! 1 डिसेंबरपासून खात्यात मोठा बदल करणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम

| Updated on: Nov 09, 2021 | 9:13 PM

बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बँकेच्या या निर्णयाचा परिणाम नवीन आणि जुने ग्राहक तसेच एनआरआय ग्राहकांवर होणार आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर 2021 रोजी पीएनबीने बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्के कमी केला होता.

PNB ग्राहकांना धक्का! 1 डिसेंबरपासून खात्यात मोठा बदल करणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम
गृह कर्ज की होम फायनान्स?
Follow us on

नवी दिल्ली : तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेने आपल्या खातेदारांना मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. बँक आपल्या ग्राहकांची बचत कमी करणार आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास बँक बचत खात्यावरील व्याजदरात कपात करणार आहे. पंजाब नॅशनल बँक 1 डिसेंबर 2021 पासून बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदर कमी करणार आहे.

बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांपर्यंत कमी

बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बँकेच्या या निर्णयाचा परिणाम नवीन आणि जुने ग्राहक तसेच एनआरआय ग्राहकांवर होणार आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर 2021 रोजी पीएनबीने बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्के कमी केला होता.

रकमेवर किती व्याज मिळेल?

पंजाब नॅशनल बँकेनुसार, 1 डिसेंबर 2021 पासून बचत खात्यातील 10 लाख रुपयांपेक्षा कमी बचत निधी खात्यावरील शिल्लक व्याजदर वार्षिक 2.80 टक्के असेल. त्याच वेळी 10 लाख रुपये आणि त्याहून अधिकसाठी व्याजदर वार्षिक 2.85 टक्के असेल.

एसबीआयनेही व्याजदर कमी केले

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बचत खात्यांवर वार्षिक 2.70 टक्के व्याजदर देते. एसबीआय 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 2.70 टक्के व्याज देते.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये किती व्याजदर?

IDBI बँक – 3 ते 3.25 टक्के
कॅनरा बँक – 2.90 टक्के ते 3.20 टक्के
बँक ऑफ बडोदा – 2.75 टक्के ते 3.20 टक्के
पंजाब आणि सिंध बँक – 3.10 टक्के व्याज मिळत आहे
खासगी बँका 3 ते 5 टक्के व्याज देत आहेत
HDFC बँक – 3 ते 3.5 टक्के
ICICI बँक – 3 ते 3.5 टक्के
कोटक महिंद्रा बँक – 3.5%
इंडसइंड बँक – 4 ते 5 टक्के

संबंधित बातम्या

या मल्टीबॅगर स्टॉकने 1100 टक्क्यांहून दिला अधिक नफा, 10 हजारांचे झाले 1.11 कोटी

छठपूजेच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! डीएमध्ये 9 टक्के वाढ, कोणाला फायदा?