AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ स्टॉकने केले गुंतवणूकदारांना मालामाल, पाच वर्षांत 1 लाखाचे झाले 82 लाख

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे हे अत्यंत धोकादायक मानले जाते. परंतु असे असूनही असे अनेक पेनी स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना फार कमी वेळात श्रीमंत केले आहे.

‘या’ स्टॉकने केले गुंतवणूकदारांना मालामाल, पाच वर्षांत 1 लाखाचे झाले 82 लाख
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 1:02 PM
Share

2021 मध्ये साधारणत: अनेक पेनी स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger) ठरलेले आहेत. जाणकारांच्या मते, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक समजले जात असते. स्टॉकमध्ये कमी लिक्विडिटीमुळे अस्थिरता निर्माण होत असते, पण जर एखाद्या लहान कंपनीचे ‘फंडामेंटल’ मजबूत असतील, तर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळू शकतो, त्यामुळे आता अनेक लोक पेनी स्टॉकचा सकारात्मक विचार करु लागले आहेत. तज्ज्ञ नेहमी ‘व्हॅल्यू स्टॉक’मध्ये (Value stock) गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत धोकादायक मानले जाते. परंतु अनेक पेनी स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत अधिक नफा मिळवून दिला आहे. शेअर बाजारातील (Stocks market) ज्या गुंतवणूकदारांना शेअरची किंमत आणि मूल्य यांच्यातील तफावतीचे बारकावे समजतात, ते या शेअरर्समध्ये गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवू शकतात.

मूल्य आधारीत स्टॉकची निवड

दरम्यान, गुंतवणुकदारांचा एक वर्ग किंमत आणि मूल्याच्या आधारे स्टॉकची निवड करतो. शेअरची किंमत त्याच्या किमतीपेक्षा कमी असेल तर ते अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, मग ते पेनी स्टॉक, स्मॉल कॅप किंवा मिडकॅप कंपनी असो याने काहीही फरक पडत नाही. बाजारात जोखीम घेण्याला अधिक महत्व असल्याचा एक विचारप्रवाह आहे. त्यानुसार ते गुंतवणूकीवर भर देत असतात.

सिंधू ट्रेड लिंक्स

ही एक मिडकॅप कंपनी आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यंदादेखील ही कंपनी गुंतवणूकदारांना श्रीमंत करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2022 मध्ये कंपनीने आतापर्यंत 90% परतावा दिला आहे. गेल्या एका आठवड्यात 20 टक्के, एका महिन्यात 60 टक्के, तीन महिन्यांत 140 टक्के तर यावर्षी आतापर्यंत 90 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात 2110 टक्के आणि गेल्या तीन महिन्यांत 940 टक्के असा उत्कृष्ट परतावा कंपनीकडून मिळाला आहे. चालू वर्षातही कंपनीची कामगिरी मजबूत राहील, असा विश्वास आहे. सहा महिन्यांपूर्वी शेअरची किंमत फक्त 10 रुपये होती. या आठवड्यात तो 139.25 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. 147 रुपये ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी राहिली आहे.

5 वर्षात 8200 टक्क्यांहून अधिक परतावा

या कंपनीची 5 वर्षांची कामगिरी पाहता, तर मिंटच्या अहवालानुसार 17 फेब्रुवारी 2017 रोजी कंपनीच्या स्टॉकची किंमत फक्त 1.69 रुपये होती. 11 फेब्रुवारी 2022 रोजी त्याची किंमत 139.25 रुपये झाली. अशाप्रकारे, त्यात 8200 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला. एखाद्या गुंतवणूकदाराने फेब्रुवारी 2017 मध्ये या कंपनीत 1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर आज त्याची किंमत 82 लाखांपेक्षा जास्त झाली असती.

डिसेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी

डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, कंपनीच्या एकत्रित निव्वळ महसुलात तिमाही आधारावर 42.47 टक्के वाढ नोंदवली गेली. ती वार्षिक आधारावर 36.24 टक्के वाढली. EBITDA तिमाही आधारावर 303 टक्के आणि वार्षिक आधारावर 160 टक्के वाढली आहे. पीएटीमध्ये 200 टक्के वाढ झाली आहे, म्हणजे तिमाही आधारावर करानंतरचा नफा आणि वार्षिक आधारावर 160 टक्के इतका राहिला आहे.

NSE वर होणार लिस्टेड

सध्या ही कंपनी फक्त BSE वर आहे. कंपनी लवकरच NSE वर लिस्टेड होण्याच्या तयारीत आहे. या कंपनीची स्थापना 1992 मध्ये झाली. ही कंपनी वाहतूक आणि लॉजिस्टिक व्यवसायात आहे. कंपनीकडे वाहतूक आणि लोडिंग सेवेच्या बाबतीत बरीच जड आणि आधुनिक उपकरणे आहेत. कंपनीचे छत्तीसगडमध्ये दोन पेट्रोल पंपही आहेत. याशिवाय कंपनीच्या अनेक उपकंपन्याही आहेत. अलीकडेच कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनीवरील कर्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीने कर्जाच्या एक तृतीयांश रक्कम कमी केली आहे. 2023 च्या अखेरीस कंपनीला कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.

क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूकीच्या विचारात आहात? अर्थ राज्यमंत्र्यांनी केले मोठे विधान…

महागाई अन् कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीतून सोने तारेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..!

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायचीये?; मग ‘या’ दहा गोष्टींचा आवश्य विचार करा, नुकसान टाळा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.