AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाई अन् कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीतून सोने तारेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..!

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजे 1860 डॉलरवर बंद झाला, तर ‘एमसीएक्स’वर तो 49 हजारांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाचे दरही 95 डॉलरवर पोचले आहेत.

महागाई अन् कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीतून सोने तारेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..!
सोने
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 11:05 AM
Share

मुंबई :  गेल्या काही वर्षांपासून देशासह जगाच्या अर्थव्यवस्थेसमोर महागाई (Inflation) ही मोठी समस्या निर्माण झालेली दिसत आहे. महागाइचा दर नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देश प्रयत्न करीत आहेत. जानेवारी महिन्यात अमेरिकेतील महागाईने गेल्या चार दशकांचा विक्रम मोडला. तेथे महागाईचा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्व घटकांमध्ये किंमत वाढ होत आहे. याला सोनेही अपवाद राहिलेले नाही. सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. महागाई वाढल्यामुळे चलनाचे मूल्य (value of the currency) कमी होत आहे. याचा परिपाक म्हणून गुंतवणूकीच्या इतर माध्यमांमधून मिळणारा परतावा कमी होत आहे. त्यामुळेच आता नागरिकांचे सोन्याकडे आकर्षण वाढत असून त्याची किंमत वाढू लागली आहे. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकावर 1860 डॉलरवर बंद झाला, तर ‘एमसीएक्स’वर (MCX) तो 49 हजारांवर पोहोचला आहे.

चलनवाढीमुळे सोन्याची मागणी वाढत असून, त्यामुळे भाव वाढत असल्याचे कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 95 डॉलरवरच्या वर गेली आहे. या आठवड्यात कच्चे तेल 95 डॉलरवर बंद झाले. युक्रेन आणि रशियामधील तणाव वाढला तर कच्च्या तेलाची किमतीसह महागाईतदेखील वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगामी काळात सोन्याच्या किमती आणखी वाढतील, असा अंदाज आहे.

सोने 50 हजारांची पातळी गाठेल?

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात अल्पावधीत सोने ‘एमसीएक्स’वर 1920 डॉलर आणि 50 हजारांच्या पातळीवर पोहोचू शकते. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले, की अमेरिकेतील वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे. कच्च्या तेलाने 95 डॉलरचा दर पार केले आहे. युक्रेन आणि रशियामधील वाद वाढल्यास कच्च्या तेल लवकरच 100 डॉलरची पातळी ओलांडू शकते, अशी शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या महागाईमुळे सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. मोतीलाल ओसवालचे उपाध्यक्ष अमित सजेजा यांच्या मते, सोने खरेदीचा कल वाढत राहील. ते प्रथम 1865 डॉलरची पातळी ओलांडेल. त्यानंतर लवकरच ते 1890 व 1900 डॉलरची पातळी ओलांडेल. ‘एमसीएक्स’वर सोन्याने 49 हजारांचा टप्पा ओलांडला असल्याचे अनुज गुप्ता यांनी सांगितले. काही काळानंतर सोने 50 हजारांचा टप्पाही पार करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायचीये?; मग ‘या’ दहा गोष्टींचा आवश्य विचार करा, नुकसान टाळा

बँकेत गॅरंटर होऊन तुम्ही फसला आहात का? मग गॅरंटरमधून ‘अशी’ करून घ्या आपली सुटका

भारतातील सर्वात मोठा बँकिग घोटाळा, स्टेट बँकसहित 28 बँकांना चुना; 22 हजार कोटींचा फेरफार!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.