सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायचीये?; मग ‘या’ दहा गोष्टींचा आवश्य विचार करा, नुकसान टाळा

श्रीमंत असो अथवा गरीब प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुंतवणूक ही महत्त्वाची असते. गुंतवणूक योग्य ठिकाणी झाल्यास त्यातून मिळणारा परतावा देखील अधिक असतो. मात्र गुंतवणूक करताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायचीये?; मग 'या' दहा गोष्टींचा आवश्य विचार करा, नुकसान टाळा
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 5:40 AM

मुंबई : श्रीमंत असो अथवा गरीब प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुंतवणूक (Investment) ही महत्त्वाची असते. गुंतवणूक योग्य ठिकाणी झाल्यास त्यातून मिळणारा परतावा (Refund) देखील अधिक असतो. मात्र गुंतवणूक करताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. जसे की आपन नेमकी जी गुंतवणूक करणार आहोत ती कशासाठी करत आहोत? म्हणजे गुंतवणुकीचा उद्देश (purpose of the investment) काय आहे. आपण ज्या कारणासाठी गुंतवणूक केली आहे. त्यावेळी आपल्याला तो पैसा वेळेत उपलब्ध होईल का?, आपण ज्या ठिकाणी पैसे गुंतवणार आहोत तिथे पैसे गुंतवण्यामध्ये रिस्क किती आहे. पैसे गुंतवण्यामध्ये रिस्क असल्यास आपण त्याचा सामना करू शकू का? गुंतवणुकीसंदर्भांत असे एकना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आज आपण अशाच दहा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्रश्नांचा तुम्ही गुंतवणुकीपूर्वीच विचार करायलाच हवा.

गुंतवणुकीसाठी दहा महत्त्वाच्या गोष्टी

1) गुतंवणुकीचा उद्देश :  आपण जो पैसा गुंतवणार आहोत तो पैसा गुंतवण्यामागे आपला उद्देश काय आहे. आपल्याला पैसा कशासाठी बचत करायचा आहे. उद्देशामध्ये दोन प्रकार पडतात शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोलमध्ये वाहन खरेदी, एखादी घरगुती वस्तू खरीदने अशा गोष्टींचा समावेश होतो. तर लॉंग टर्म गोलमध्ये घर खरेदी, शिक्षण, लग्न अशा गोष्टींचा समावेश होतो. या गुंतवणुकीमधून तुमचा उद्देश साध्य होणार असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता.

2) गुतंवणुकीचा कालावधी : आपण करत असलेल्या गुतंवणुकीचा कालावधी किती आहे. तेवढ्या कालावधीपर्यंत आपण पैशांची गुंतवणूक करू शकतो का याचा विचार करणे देखील महत्त्वाचे असते.

3) वेळेत पैसे परत मिळणार का: आपण एखाद्या विशिष्ट वेळेसाठी किंवा कामासाठी पैशांची गुंतवणूक करत असतो. आपण गुंतवणूक केलेला पैसा त्या वेळेत आपल्या परत मिळणार का याचा विचार करावा.

4) गुंतवणुकीमधून परतावा किती मिळणार :  प्रत्येक जण चांगल्या परताव्यासाठीच गुंतवणूक करत असतो. तेव्हा आपण जी गुंतवणूक करणार आहोत त्यामधून किती परतावा मिळणार याचा विचार करावा.

5) मिळणाऱ्या परताव्यावर टॅक्स लागणार का : आपल्याला जो परतावा मिळणार आहे, त्यावर आपल्याला टॅक्स लागणार का? लागल्यास आपल्याला टॅक्सच्या रुपात किती पैसे भरावे लागणार याचा विचार करावा.

6) गुंतवणूक साधण : आपण नेमकी गुंतवणूक कशामध्ये करणार आहोत. म्हणेज शेअर मार्केट, बँकेची एखादी योजना, म्यूचल फंड की अन्य एखादी स्कीम याचा देखील विचार करणे गरजेचे असते.

7) गुंतवणुकीमधील जोखमी: आपण ज्या ठिकाणी पैसे गुंतवणार आहोत, त्या स्कीममध्ये किती जोखमी आहे, याचाही विचार करा. समजा तुम्ही एखाद्या बँकेत पैशांची एफडी केली तर त्यामध्ये रिस्क कमी असते. मात्र तुम्ही जर तेच पैसे शेअर मार्केट किंवा म्युचल फंडमध्ये गुंतवले तर त्यात रिस्क अधिक असते.

8) जोखमेचा सामना : तुम्ही जर एखाद्या चांगला परतावा देणाऱ्या मात्र उच्च जोखमी असलेल्या योजनेत पैसे गुंतवले आणि दुर्दैवाने तुमचे पैसे बुडाले तर असा परिस्थितीचा तुम्ही सामना करू शकता का?

9) गुंतवणुकीची किंमत : अनेक योजना अशा असतात की, ज्यांची किंमत वर्षानुवर्ष तेवढीच राहाते किंवा अल्प प्रमाणात वाढते. मात्र अनेक योजना अशा  देखील आहेत, ज्या तुम्हाला अल्प कालावधितच भरघोस नफा मिळून देतात.

10)  निष्कर्ष : तुम्ही जेव्हा वरील नऊ गोष्टींचा विचार करता तेव्हा त्यातून एक निष्कर्ष निघतो. तो म्हणजे तुम्ही जिथे पैसे गुंतवणार आहात, तो गुंतवणुकीचा मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे का.  हेच सांगणार एक व्हीडिओ Ankur Warikoo यांच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

भारतातील सर्वात मोठा बँकिग घोटाळा, स्टेट बँकसहित 28 बँकांना चुना; 22 हजार कोटींचा फेरफार!

ONGC मालामाल, तेल-गॅस भाववाढ पथ्यावर; थेट नफा 8 हजार कोटी!

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार? पहा अर्थमंत्री कराड काय म्हणतात

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.