Heavy Rain Warning : 6, 7 आणि 8 डिसेंबरला अतिमुसळधार पाऊस, थेट हाय अलर्ट जारी, या राज्यांमध्ये..
Maharashtra Weather Update : राज्यासह देशात सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी परिस्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे.

राज्यात गारठा जवळपास गेला आहे. देशातील सर्वच भागात वातावरण वेगवेगळे आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचे ढग जाण्याचे नाव घेत नाहीत, तिथे सतत पाऊस सुरू आहे. राज्यात पुढीत तीन ते चार दिवसांमध्ये गारठा वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. सध्या राज्यात थंडी कमी झाली असून दुपारच्यावेळी उष्णता वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये पाऊस इतका मुसळधार सुरू आहे की, मागील सर्व विक्रम मोडले. काही राज्यामधून पाऊस जाण्याचे अजिबातच नाव घेत नाहीये. अनेक राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. राज्यामध्येही नोव्हेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यात पाऊस झाला. आता संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाजा आहे.
6, 7 आणि 8 डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस
मान्सूनच्या हंगामात हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडला. हिमाचल प्रदेशातील हवामान पुन्हा बदलले आहे. हवामान खात्याने 6, 7 आणि 8 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मान्सूनच्या आगमनापासून केरळमध्ये सतत पाऊस पडत आहे. आता हवामान पुन्हा बदलले आहे. हवामान खात्याने 6, 7 आणि 8 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
धुळे 8.6 अंस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून पंजाबच्या अदमपूर येथे नीचांकी 2 अंश तापमानाची नोंद झाली. 24 तासांमध्ये होनावर येथे उच्चांकी 35.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारठा असे वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा तर काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
उत्तराखंडसह जम्मू काश्मीरमध्ये पाऊस
हवामान खात्याने 6, 7 आणि 8 डिसेंबर रोजी उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. बर्फवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसासह बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला. यामुळे पुढील काही दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
