ONGC मालामाल, तेल-गॅस भाववाढ पथ्यावर; थेट नफा 8 हजार कोटी!

तिसऱ्या तिमाहित ओएनजीसीच्या निव्वळ नफ्यात तब्बल सात टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहित निव्वळ नफा 8,764 कोटी रुपये झाला आहे.

ONGC मालामाल, तेल-गॅस भाववाढ पथ्यावर; थेट नफा 8 हजार कोटी!
ओएनजीसी
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 9:25 PM

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) आघाडीची कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) तिमाही अहवाल प्रकाशित केला आहे. उत्पादनातील घसरणीमुळे तेल आणि गॅसच्या (Oil and Gas) वाढत्या किंमती ओएनजीसीच्या पथ्यावर पडल्याचं अहवालातून दिसून आलं आहे. तिसऱ्या तिमाहित ओएनजीसीच्या निव्वळ नफ्यात तब्बल सात टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहित निव्वळ नफा 8,764 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत 1,254 कोटी रुपये नफा झाला होता. ओएनजीसीला चालू आर्थिक तिमाहित प्रति बॅरेल साठी 75.73 अमेरिकी डॉलर मिळाले. समान कालावधीसाठी बॅरेलच्या भावाचा आकडा 43.20 डॉलर प्रति बॅरेल होता. वाढत्या किंमतीसाठी उत्पादनातील घसरणीचं मुख्य कारण सांगितलं जातं. कोविड प्रकोपामुळे तसेच चक्रीवादळामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात बंधने होती. त्यामुळे कच्चे तेल आणि गॅसच्या उत्पादनाचा आलेख घसरला.

‘ओएनजीसी’ला हवा चेअरमन :

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये चेअरमन आणि कार्यकारी संचालकाचे पद अद्याप रिक्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ओएनजीसी योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. केंद्र सरकारने चेअरमनच्या नियुक्तीसाठी समिती गठित केली आहे. ओएनजीच्या प्रमुख पदाच्या निवडीसाठी चार फेब्रुवारीला समिती नियुक्त करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या संचालक मंडळाची नियुक्ती समितीच्या शिफारशीनुसार केली जाते. दरम्यान, पीईएसबीने गेल्या वर्षी 9 पैकी एकाही उमेदवाराला शिफारशीसाठी पात्र समजले नाही. या नऊ उमेदवारांपैकी दोन उमेदवार भारतीय सनदी सेवेत कार्यरत अधिकार होते.

ओएनजीसीचा अहवाल आकड्यांमध्ये :

1. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये गॅस किंमतीत वाढ, सध्या 2.90 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल यूनिट भाव 2. तेल उत्पादन 3.2 टक्के घसरणीसह 54.5 लाख टन पोहोचले. 3. गॅस उत्पादन 4.2 टक्के घसरणीसह 5.5 अरब घन मीटर 4. चालू आर्थिक वर्षात ओएनजीसीच्या नफ्यात सात टक्क्यांनी वाढ 5. ओएनजीसीचा नफा तिमाहित 31,446 कोटींवर, एप्रिल-डिसेंबर 2020 मध्ये 4,512 कोटी 6. कंपनीच्या उत्पन्नात 61.5 टक्क्यांच्या वाढ, उत्पन्न 75,849 कोटी

इतर बातम्या :

Uddhav Thackeray : ‘थप्पड से डर नहीं लगता, प्यार से लगता है’, शायरीद्वारे कौतुक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही दाद

10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं

Non Stop LIVE Update
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.