AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ‘थप्पड से डर नहीं लगता, प्यार से लगता है’, शायरीद्वारे कौतुक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही दाद

कार्यक्रमावेळी निवेदकाने 'हर खदान मे हिरा मिल नही सकता, हर बाग मे फुल खिल नही सकता; युं तो धन दौलत मिल जाती है सभी को, किंतू हमारे उद्धव ठाकरेजी जैसा दुसरा व्यक्तीमत्व संसार मे हो नकी सकता', अशा शायरीतून मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही या शायरीला दाद दिली आणि सलमान, सोनाक्षीच्या चित्रपटातील एक डायलॉग सांगितला.

Uddhav Thackeray : 'थप्पड से डर नहीं लगता, प्यार से लगता है', शायरीद्वारे कौतुक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही दाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 12, 2022 | 8:09 PM
Share

मुंबई : आपल्या कामामुळे सर्वसामान्य माणसाला समाधान वाटले पाहिजे त्यादृष्टीने काम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच सुशासनासाठी वृत्तीतही बदल हवा, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या (Public Trust Registration Office) नूतन वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमावेळी निवेदकाने ‘हर खदान मे हिरा मिल नही सकता, हर बाग मे फुल खिल नही सकता; युं तो धन दौलत मिल जाती है सभी को, किंतू हमारे उद्धव ठाकरेजी जैसा दुसरा व्यक्तीमत्व संसार मे हो नकी सकता’, अशा शायरीतून मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही या शायरीला दाद दिली आणि सलमान, सोनाक्षीच्या चित्रपटातील एक डायलॉग (Movie dialog) सांगितला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केल्यानंतर शायरीद्वारे झालेल्या कौतुकाला दाद दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आतापर्यंत मी अनेक भूमिपूजन, अने उद्घाटनं झाली. पण आता जे माझं वर्णन केलं गेलं ते ऐकल्यानंतर नाही म्हटलं तरी माझ्यावर एक दबाव आला आहे. याचं कारण कल्पना असेल आपल्याला की सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आदिती कुठला तो चित्रपट… त्यात सोनाक्षी म्हणते की ‘थप्पड से डर नही लगता साहब प्यार से लगता है’. आम्ही राजकारणातील लोक. नेहमी थपडा देणं आणि थपडा खाणं हे आमचं आयुष्य. त्यामुळे कौतुक केलं की थोडीशी धडधड होते. पण मला कल्पना आहे की ते कौतुक करणारे वेगळे आणि माझ्या घरच्यांनी माघं कौतुक करणं हे वेगळं’.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी, धर्मदाय वकील संघटनचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राजेश टोपे यांच्या कार्याचं कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक कुटुंबप्रमुख म्हणून माझे कौतूक करतात. पण शासन-प्रशासनाच्या, जनतेच्या सहकार्याशिवाय काही होत नाही. या सर्वांच्या सहकार्यामुळेच कोविड काळात राज्याचं काम देशात उजवं ठरलं. राज्यात अनेक कोविड केंद्र उभारली, चाचणी केंद्र उभारली गेली. कोविड काळात जास्तीत जास्त चांगली सेवा सर्वसामान्य माणसाला देता आल्यानेच जनतेचे प्राण आपण वाचवू शकलो. स्वत: राजेश टोपे या कामात पाय रोवून उभे राहिले. त्यामुळे या कामावर होणाऱ्या आरोपांना घाबरू नये.

काम करण्याच्या वृत्तीतही बदल करणे आवश्यक, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एखादं पद, अधिकार लाभला की मी बरा, माझे कार्यालये बरे असं न समजता मिळालेल्या अधिकाराचा, पदाचा समाजासाठी वापर करणे गरजेचे आहे. केवळ इमारतीचे नुतनीकरण करून चालणार नाही. काम करण्याच्या वृत्तीतही बदल करणे आवश्यक आहे. सुशासनासाठी कार्याच्या पद्धतीत बदल करणे, लोकाभिमूख कार्याची दिशा निश्चित होणे आवश्यक असुन या नूतन इमारतीत येऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर लोक हसत बाहेर गेले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत या विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्याबरोबरच आवश्यक असलेल्या सोयी-सुविधां उपलब्ध करुन देण्यात येतील. जिथे जिथे सरकारची मदत आवश्यक तिथे प्रत्येक पावलावर शासन तुमच्यासोबत असुन सर्वसामान्य माणसाला समाधानी ठेवा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

इतर बातम्या :

Eknath Shinde : वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काय हरकत नाही, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच

10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...