Uddhav Thackeray : देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेच नंबर वन!

प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे.

Uddhav Thackeray : देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेच नंबर वन!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार तकलादू आहे. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असा दावा भाजपकडून केला जातोय. त्याचबरोबर कोरोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडत असल्याची टीकाही विरोधकांकडून सातत्याने केली जातेय. अशावेळी महाविकास आघाडी सरकार आणि खासकरुन शिवसेनेसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे. (Uddhav Thackeray is the best CM of 13 states)

प्रश्नमकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या 13 राज्यांमध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या 67 टक्के लोक राहतात. या सर्वेक्षणात नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसामचा समावेश नाही. तर आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नसल्याचं सांगितण्यात आलं आहे.

प्रश्नमच्या सर्वेक्षणात 3 पर्याय

प्रश्नमने घेतलेल्या सर्वेक्षणात 13 राज्यात मिळून एकूण 17 हजार 500 जणांनी आपलं मत नोंदवलं. महत्वाची बाब म्हणजे हे सर्वेक्षण सर्वात मोठ्या सर्वेक्षणापैकी एक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात 3 पर्याय देण्यात आले होते.

1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून नको
2. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही
3. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, पुन्हा हेच मुख्यमंत्री हवे

उद्धव ठाकरेंना 49 टक्के मतं

या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत.

उत्तराखंड, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबाबत नकारात्मक मत

दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबत मात्र नकारात्मक मतं मोठ्या प्रमाणात नोंदली गेली आहे. 60 टक्के मतदारांनी अमरिंदर सिंग यांची कामगिरी खराब असल्याचं म्हटलंय. तर केवळ 15 टक्के लोकांनीच त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांच्याबाबत सर्वाधिक नकारात्मक मतं नोंदवण्यात आली आहेत. त्यानंतर पंजाब आणि गुजरातचा समावेश लागतो.

संबंधित बातम्या :

साहसी पर्यटन धोरणास मान्यता ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीतील तीन मोठे निर्णय

Maharashtra tourism policy 2021 : आदित्य ठाकरेंचं मोठं प्लॅनिंग, साहसी पर्यटन धोरण मंजूर, नेमकं नियोजन काय?

Uddhav Thackeray is the best CM of 13 states in the survey

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI