
भारतीय शेअर बाजारात तेजीचा सिलसिला कायम आहे. मागच्या आठवड्यातील तेजीनंतर सोमवारी दोन्ही इंडेक्स ग्रीन झोनमध्ये ओपन झाले. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअरवाला सेंसेक्स (Sensex) 500 अंकांनी उसळी घेऊन 78,903.09 लेव्हलवर ओपन झाला. दुसऱ्याबाजूला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने (Nifty) सुद्धा तेजीसह 23,949.15 स्तरावर व्यवहार सुरु केला. सुरुवातीच्या सत्रात बँकिंग आणि आयटी स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. HDFC Bank ते SBI चे स्टॉक पळताना दिसले. त्याशिवाय Tech Mahindra आणि Infosys ने सुद्धा चांगली सुरुवात केली.
शेअर मार्केट ओपन होताच सेन्सेक्स उसळीसह 78,903.09 वर ओपन झाला. काही वेळातच 555 अंकांच्या तेजीसह 79,152.86 लेवलवर व्यवहार करताना दिसला. अशा तऱ्हेने निफ्टी इंडेक्स सुद्धा मागच्यावेळच्या 23,851 च्या तुलनेत वाढून 23,949.15 अंकांवर खुला झाला. त्यानंतर निफ्टीने सुद्धा सेंसेक्सच्या पावलावर पाऊल टाकून वेग पकडला. निफ्टीने सुद्धा काहीवेळाच्या व्यवहारात 24,004 चा टप्पा गाठला.
या 10 शेअर्समध्ये तेजी
शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात लार्ज कॅप शेअर्समध्ये Tech Mahindra Share (3.54%), Infosys Share (2.80%), Axis Bank Share (2.54), HDFC Bank Share (2.20%), SBI Share (2.10%) IndusInd Bank Share (1.90%) या शेअर्समध्ये तेजी होती. मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये Yes Bank Share (4.37%), Suzlon Share (3.29%), AU Bank Share (3.10%) आणि Paytm Share (2.60%) ट्रेंड करत होते.
स्मॉलकॅप शेअर्समध्ये वेग
स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायच झाल्यास यात Deccan Gold Mines Share 15.47% तेजीसह व्यवसाय करत होता. त्याशिवाय Primo Chemicals Share ने 9 टक्के उसळी नोंदवली. JustDial Share (7.20%), InoxWind Share (5.72%), Shilctech Share (5%) आणि Senco Gold Share (5%) उसळीसह व्यवहार करत होते.