
शिरपूर : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिरपूर तालुक्यातील दुर्गम क्षेत्राततील साटिपाणी गावातील तरुण डॉक्टर रवींद्र पावरा यांनी मशरूम उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रयोग आपल्या झोपडीत केला आहे. अवघ्या दीड महिन्यात पंचवीस ते तीस हजाराचा नफा देखील या तरुणाला मिळतो आहे. उच्च शिक्षण घेऊन रुग्णांची सेवा करता करता या तरुणांनी मशरूम (Mushroom Farming) उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली आहे.डाॅ.रविद्र पावरा यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले असुन शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात ते कर्तव्यावर आहेत.डाॅ रविंद्र पावरा यांचा पारंपारिक व्यवसाय शेती आहे वडिलांची अल्पभुधारक कोरडवाहु शेती आहे. पारंपरिक शेतीच्या माध्यमातून आजतोवर डॉ रवी पावरा यांचा उदरनिर्वाह होत असे.डॉ रवींद्र पावरा यांना शिक्षणासोबत शेतीत देखील आवड असल्याने पारंपरिक शेतीसोबतच शेतात नवीन वेगळे काही प्रयोग करण्याचा त्यांची जिद्द होती.
डॉ रवींद्र पावरा यांना मशरूम शेती बाबत माहिती मिळवत आणि धडगाव या ठिकाणी मशरुम व्यवसाय प्रशिक्षणाला उपस्थिती राहत आपल्या भागात देखिल याचा प्रयोग करण्याचे त्यांनी निश्चित केले.या मशरुम शेतीसाठी राजेंद्र वसावे व लिलाताई वसावे यांचे त्यांना अनमोल मार्गदर्शनातुन डाॅ.रविंद्र पावरा या तरुणाने दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधलीय. मशरुम आता सटीपाणी या सातपुडा पायथ्याशी असलेल्या दुर्गम क्षेत्रातील दुष्काळी पट्यात येत असल्याने डॉ रवींद्र पावरा यांच्या कुटूंबाची देखील यासाठी मदत लाभत आहे.
मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर डॉ.रवींद्र पावरा यांना कमी खर्चात मशरुम उत्पादनासाठी शेड उभारणे शक्य नसल्याने शेतात असलेल्या झोपडीतच आतून आणि बाहेरून ग्रीन मॅट लावत.या मशरूम शेतीचा प्रयोग सुरु केला.थंड प्रदेशात उत्पादन होत असलेल्या मशरूम शेतीचे दुर्गम भागात उत्पादन घेणे शक्य नसल्याचे अनेकांनी डॉ रवी पावरा यांना सांगीतले होते.मात्र याकडे दुर्लक्ष करत डॉ रवी पावरा यांनी अखेर मशरूम शेतीतून उत्पादन घेतले आहे.
गव्हाचा किंवा सोयाबीनचा भुस्सा घेऊन ते पाण्यात मिक्स करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. भिजलेला भुसा बाहेर काढून मोकळा करायचा. त्यात 60 टक्के आद्रता झाल्यास त्या भुस्यामध्ये (spawn) मशरुम बीज टाकून पॉलिथिनमध्ये भरुन घ्यायचे. त्यानंतर ते बेड एका हवा बंद रुममध्ये ठेवायचे. ज्या रुमचे तापमान 20 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस आणि आद्रता 60 टक्के ते 70 टक्के असावी. 15 दिवसानंतर ते बेड पांढरे शुभ्र पडल्यावर मोकळे करुन ठेवायचे. बेड मोकळे केल्यावर त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारायचे. 25 दिवसानंतर त्यावर मशरूम यायला सुरुवात होते. मशरूम पीक हे साधारण 45 दिवसाचं असते.
मशरुम हे पंच्चेचाळीस दिवसांचे उत्पादन देत असते. या काळात तीन वेळा याची काढणी करता येते. ज्यात पहिल्यांदा 25 व्या दिवशी त्यानंतर 35 व्या आणि शेवटची काढणी ही 45 व्या दिवशी घेतली जाते. हे मशरुम काढल्यानंतर याचे पॅकेजिंग 1 किलो अश्या मागणीप्रमाणं केली जाते. ज्याला तीनशे रुपये प्रति किलो दर त्यांनी निश्चित केला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटची काढणी करेपर्यंत सर्व मिळून उत्पादन खर्च अत्यंत कमी म्हणजेच सहा हजारांपर्यंत येतो. याचे उत्पन्न हे तीस हजारांच्या आसपास होते. सगळा खर्च जाऊन या तरुणांना 45 दिवस म्हणजे दीड महिन्यात निवल पंच्चवीस ते तीस हजारांचा फायदा होतो.
रुग्णांची सेवा करता करता मशरूमची शेतीत यशस्वी झालेल्या डॉक्टर रवींद्र पावरा यांचं आता या दुर्गम भागातील तरुणांना या व्यवसायाकडे वळवण्याचा स्वप्न असून यातून लाखोचा फायदा घेण्यासाठी तरुणांनी याचं प्रशिक्षण घ्यायला हवं आणि दुर्गम भागात हा व्यवसाय सुरू करायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.