AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण म्हणतं शेतीत उत्पन्न नाही?; स्ट्रॉबेरीतून लाखोंचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरूणाची सक्सेस स्टोरी वाचा…

Nanded Balaji Upwar Famer Success Story : 10 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला... 6 लाखांच्या उत्पन्नाची हमी, नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग... उच्च शिक्षित तरूण शेती व्यावसायात आला अन् यशस्वी झाला. शेतीमध्ये उत्पन्न नाही म्हटलं जातं. पण ही कहानी वाचा, प्रेरणा मिळेल.

कोण म्हणतं शेतीत उत्पन्न नाही?; स्ट्रॉबेरीतून लाखोंचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरूणाची सक्सेस स्टोरी वाचा...
| Updated on: Jan 09, 2024 | 10:08 AM
Share

यशपाल भोसले, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नांदेड | 09 जानेवारी 2024 : शेती व्यावसाय परवडत नाही. शेतीमध्ये उत्पन्न नाही. शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते. पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही, अशी ओरड आपण नेहमी ऐकतो. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी सक्सेस स्टोरी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुमचीही पावलं शेती व्यावसायाकडे वळतील… ही कहानी एका उच्च शिक्षित तरूण शेतकऱ्याची. नांदेडमधील बारड गावचा बालाजी उपवार यांने उच्च शिक्षण घेतलं. बी.ए झाल्यानंतर त्याने शेतीची वाट धरली. 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली अन् आज त्याला लाखोंचं उत्पन्न मिळू शकतं.

पारंपरिक शेतीला बगल, आधुनिक शेतीची वाट

काळाप्रमाणे शेतीत देखील अनेक बदल होताना आपल्याला दिसून येतात . तसेच शेतकरी वर्षानुवर्ष पारंपारिक शेतीत अडकलेला देखील आपण पाहत होतो. मात्र, जसा काळ बदलला तशी शेतीची करण्याची पद्धत देखील बदलत चाललेली आहे. शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यात नांदेडच्या बारड येथील एका सुशिक्षित शेतक-याने पारंपरिक शेतीला बगल देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवीन प्रयोग केलाय . 10 गुंठ्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग केला आहे.

नांदेडमध्ये स्ट्रॉबेरीची शेती

बारड इथं राहणारा बालाजी मारोती उपवार हा एक अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांचं शिक्षण बी.ए ग्रॅज्युएशन झाले आहे. हा तरूण शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतो. बालाजी उपवार यांनी यंदाच्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहा गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. त्यांनी हे स्ट्रॉबेरीची रोपं महाबळेश्वरवरून आणले होते. नाभिला जातीची ही स्ट्रॉबेरी असून 4000 कलमे त्यांनी आणली होती. या स्ट्रॉबेरीची लागवड करताना त्यांनी संपूर्ण सेंद्रीय पद्धतीचा वापर केला आहे. तसेच त्यांनी ठिबक आणि मलचिंग पेपरचा वापर करून या पिकाची लागवड केली आहे.

स्ट्रॉबेरीची विक्री कशी करणार?

दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीतनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे. बालाजी यांनी थेट बाजारात ही स्ट्रॉबेरी न विकता त्यांनी ‘शेतकरी ते ग्राहक’ या तत्वाचा अवलंब करत थेट आपल्या शेतापुढेच स्टाॅल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत. त्यामुळे थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे.

किती उत्पन्न मिळणार?

प्रतिकिलो 300 रुपये या प्रमाणे सध्या त्याची विक्री होत आहे. थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहक देखील ते आवडीने घेताना पहायला मिळत आहेत.लागवड खर्च दीड लाख रूपये आला आहे. तर 30 किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री होत असून 5-6 लाख रूपये उत्पन्न मिळण्याची आशा बालाजी यांनी व्यक्त केली आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.