AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेवढ्या’ जागा अजितदादांना देणं शक्य नाही; शिंदे गटाच्या खासदाराचं मोठं विधान

Krupal Tumane on Mahayuti and Loksabha Election 2024 : मागच्या वेळी आम्ही 22 जागा लढल्या, यंदा...; लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा किती जागांवर दावा?, अजित पवार गटाला किती जागा मिळणार? विदर्भातील जागावाटपाचं काय? शिंदे गटाच्या खासदाराचं मोठं विधान, नेमका दावा काय? वाचा...

'तेवढ्या' जागा अजितदादांना देणं शक्य नाही; शिंदे गटाच्या खासदाराचं मोठं विधान
| Updated on: Jan 09, 2024 | 8:37 AM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 09 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने महायुतीच्या जागावाटपावर स्पष्ट भाष्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी 22 जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने मागच्यावेळेस 22 जागा लढल्या. त्या 22 जागा या निवडणूकीत आम्हाला हव्या आहेत. पण तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील. आमचे सध्या 13 खासदार असले तरी आमचे 18 खासदार निवडून आले होते. पण 22 जागा आम्ही लढलो होतो. त्यामुळे आमची मागणी 22 जागांचीच आहे, असं कृपाल तुमाने म्हणालेत.

“तेवढ्या’ जागा राष्ट्रवादी अजितदादांना देणं शक्य नाही”

आम्हाला 22 जागा दिल्या. छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार त्यांना 22 दिल्या. तर मग भाजपवाल्यांनी विचार करावा. पण जेवढ्या जागा आम्हाला तेवढ्या जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला देणं शक्य नाही. गेल्यावेळेस आम्ही 18 जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी चार जिंकल्या आणि भाजपने 21 जिंकल्या होत्या. त्यामुळे सिटिंगमध्ये ज्यांनी ज्या जागा जिंकल्या त्यांना त्या मिळतील. त्यापेक्षा जास्त जागा देण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं तुमाने म्हणाले.

भुजबळांना टोला

आमच्या येवढ्याच जागा राष्ट्रवादीच्या… असं छगन भुजबळ यांना बोलायला काहीच लागत नाही. मी म्हणतो आम्हाला 48 जागा द्या मिळणार आहे का? बोलणं आणि प्रॅक्टिकल देणं, यात फरक आहे. त्यांनाही माहित आहे. त्यांच्याजवळ तरी उमेदवार कुठे आहे? जे निवडून येऊ शकेल त्यांनाच उमेदवारी मिळेल , असा टोलाही कृपाल तुमाने यांनी भुजबळांना लगावला.

विदर्भातील जागा कुणाकडे?

विदर्भात राष्ट्रवादी अजितदादा गटाला तीन जागा देणं शक्य नाही. विदर्भात तीन आम्ही जिंकलो आहोत. सहा जागा भाजप जिंकल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी किती लढली याचा अभ्यास त्यांनी करावा. कुठे किती मतं राष्ट्रवादीला मिळाली याचा अभ्यास त्यांनी करावा. त्यांनी नाही केला तर तिन्ही पक्षाचे नेते हा अभ्यास करतील आणि ठरवतील, असंही तुमाने म्हणाले.

कोणत्याही जागांची अदलाबदल होणार नाही. आमच्या महायुतीच्या ताकदीवर 45 पेक्षा जागा निवडून आणू आणि काँग्रेसकडे लोकसभेची केवळ एक जागा होती. ती काँग्रेस आता शुन्यावर येईल. ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत. त्या जागा त्याच पक्षाकडे राहणार आहेत. या महिन्याच्या शेवटपर्यंत जागावाटपाचा निर्णय अंतिम होणार आहे. आम्ही जोमानं निवडणुकीची तयारी केलीय. आम्ही जिंकू असा विश्वास आहे, असं कृपाल तुमाने म्हणालेत.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.