Post Office Schemes : तीन मुली असल्या तरी तिघींच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येणार; कसा मिळणार लाभ? जाणून घ्या नियम

मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील खर्चासाठी पैसे जमा करायचे असतील, तर सुकन्या समृद्धी योजना हा पालकांसाठी एक पर्याय आहे. मात्र या योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींच्याच नावावर खाते उघडता येतं. मग एखाद्या कुटुंबात तीन मुली असतील,तर ? तिसऱ्या मुलीच्या नावावर खातं उघडता येतं नाही का ? याचं उत्तर जाणून घ्या

| Updated on: Oct 25, 2026 | 7:03 PM
1 / 8
मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील खर्चासाठी पैसे जमा करायचे असतील, तर सुकन्या समृद्धी योजना हा पालकांसाठी एक पर्याय आहे. मात्र या योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींच्याच नावावर खाते उघडता येतं.

मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील खर्चासाठी पैसे जमा करायचे असतील, तर सुकन्या समृद्धी योजना हा पालकांसाठी एक पर्याय आहे. मात्र या योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींच्याच नावावर खाते उघडता येतं.

2 / 8

मग एखाद्या कुटुंबात तीन मुली असतील,तर ? तिसऱ्या मुलीच्या नावावर खातं उघडता येतं नाही का ? हा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्याचं उत्तर आहे 'हो' काही विशिष्ट नियम फॉलो करून तिसऱ्या मुलीसाठीही खातं उघडता येऊ शकतं.

3 / 8

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली बचत योजना आहे. सर्वसाधारण नियमांनुसार, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावावर या योजनेत खाते उघडता येते.

4 / 8

मुलगी दहा वर्षांची होण्यापूर्वी तिच्या पालकांना किंवा कायदेशीर पालकाला तिच्या नावावर खातं उघडता येतं. मात्र एका मुलीच्या नावावर या योजनेत एकच खातं उघडण्याची परवानगी आहे.

5 / 8

तिसऱ्या मुलीसाठी खातं कसं उघडायचं? : यामध्ये जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मासाठी विशेष तरतूद आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये दोनपेक्षा जास्त मुलींच्या नावावर खाते उघडता येतं.

6 / 8

पहिल्याचं प्रसुतीत तिळ्या मुली जन्माला आल्या तर नियमांनुसार तिन्ही मुलींसाठी खाते उघडण्याची परवानगी मिळू शकते. पहिल्या प्रसूतीत एक मुलगी आणि दुसऱ्या प्रसुतीत जुळ्या मुली झाल्या, तर आवश्यक अटी पुर्ण केल्यास तिन्ही मुलींसाठी खाते उघडता येतं. मात्र पहिल्या प्रसुतीत जुळ्या मुली झाल्यानंतर दुसऱ्या प्रसुतीत एक मुलगी झाली तर तिसऱ्या मुलीसाठी खातं उघडण्याची परवानगी या अपवादाअंतर्गत मिळत नाही.

7 / 8

कागदपत्रं कोणती लागतात: जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मामुळे विशेष सवलत मागितल्यास संबंधित जन्मप्रमाणपत्र आणि योजनेच्या नियमांनुसार आवश्यक प्रतिज्ञापत्र किंवा वैद्यकिय पुरावा सादर करावा लागू शकतो. याची सविस्तर चौकशी संबंधित ठिकाणाहून घ्यावी.

8 / 8

या योजनेत किती पैसे जमा करता येतात : हे खाते 250 रूपये भरून सुरू करता येतं. तर कमाल 1.5 लाखही जमा करता येतात. या खात्याची मुदत मुलगी 21 वर्षांची झाल्यावर संपते आणि तोपर्यंत आत्ताच्या व्याजाच्या टक्केवारीनुसार 8.2 टक्केवारीनुसार 17 - 18 लाख मिळू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us