करदाते लक्ष द्या! 31 मार्चआधी उरकून घ्या ही कामं, नाहीतर द्यावा लागेल दंड

| Updated on: Mar 05, 2021 | 12:21 PM

अंतिम मुदतीआधी तुम्हाला ही महत्त्वाची कामं करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कर भरला नसेल तर तो तात्काळ देणं महत्त्वाचं आहे.

करदाते लक्ष द्या! 31 मार्चआधी उरकून घ्या ही कामं, नाहीतर द्यावा लागेल दंड
Follow us on

नवी दिल्ली : तुमच्या आर्थिक गणिताबद्दल अशी काही महत्त्वाची माहिती आहे, ज्यासाठी तुम्हाला 31 मार्चपर्यंत काही गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत. अंतिम मुदतीआधी तुम्हाला ही महत्त्वाची कामं करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कर भरला नसेल तर तो तात्काळ देणं महत्त्वाचं आहे. उशीरा देय दिल्यास तुम्हाला व्याज किंवा दंड भरावा लागेल. (taxpayers 5 tax related tasks you need to complete before march 31)

कर भरला नसेल तर भरून घ्या

आयकर रिटर्न भरण्यासाठी 31 मार्च अंतिम तारीख आहे. यामुळं आयकर विभागानं ‘झटपट प्रोसेसिंग‘ ही सुविधा सुरु केली आहे. तुम्ही जर आतापर्यंत आयकर रिटर्न भरला नसेल तर नव्या सुविधेचा वापर करुन लवकर आयकर रिटर्न भरु शकता. पगारदारांसाठी ही खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. जे पगारदार आयकर भरणार नाहीत त्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आयकर रिटर्न भरताना काही अडचण असल्यास सीएला संपर्क साधू शकता.

ITR प्रमाणित (Verify) केला नाही तर काय होईल?

– ITR भरल्यानंतर विहीत मुदतीत तो वेरिफाय केला नाही तर, ITR वैध मानले जाणार नाही.

– आयकर रिटर्न भरून देखील वेरिफाय करुन घेतला नाही तर करदात्याला दंड भरावा लागू शकतो किंवा आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

– ITR रिटर्न भरलेल्या दिवसापासून 120 दिवसांच्या आत वेरिफिकेशन केले नाही तर तुम्हाला इनकम टॅक्स रिफंडची रक्कम मिळणार नाही.

पॅन आधारशी जोडणं महत्त्वाचं

31 मार्चनंतर, ज्यांचे पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल. एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. हल्ली इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी, पॅन कार्जसह आधार क्रमांक देणंसुद्धा आवश्यक असणार आहे. याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

या कर्मचाऱ्यांना कर लागू होणार नाही

सध्याच्या नियमानुसार कंपनी आणि आपल्या पगारातून जवळपास 12 टक्के पैसे पीएफ खात्यात जमा केले जातात. सध्या यावर कुठलाही कर लागत नाही. परंतु नव्या नियमानुसार, उच्च उत्पन्न असणाऱ्यांना हा कर भरावा लागणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना या नियमाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

अर्थसंकल्पात सीतारमण नेमक्या काय म्हणाल्या होत्या?

उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानावर कर आकारला जाणार आहे. त्यानुसार पीएफ खात्यात 2.5 लाखांहून अधिक रक्कम जमा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्याजावरील करसूट रोखण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय जे कर्मचारी ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीत (vpf) गुंतवणूक करतात, त्यांना या नियमाचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण त्यांना अधिकच्या रकमेसाठी कोणतीही करसूट मिळणार नाही.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा नियम आणखी कडक करण्याचा निर्णय

पीएफ खात्यांवरील केवायसी (KYC) च्या नावे पैसे काढून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समोर आलीत. याचा सामना करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केलीत. ईपीएफओने पीएफ खात्यांमधून फसवणूक होत असल्याची प्रकरण वाढल्यानंच नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात. ईपीएफओच्या माहितीनुसार, सदस्याच्या प्रोफाईलमधील नावे, वडिलांचे/पतीचे नाव, जन्म तारीख आणि लिंग यामधील चुका दुरुस्त करण्यास परवानगी देण्यात आलीय.

पुरावा सादर केल्यानंतर नाव बदलेल

पीएफ खात्यात नाव, वाढदिवस, नामनिर्देशित व्यक्ती, पत्ता, वडील किंवा पतीच्या नावात मोठे बदल कंपनी आणि लाभधारकांचे कागदी पुरावे पाहूनच केले जातील. केवायसीमधील ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमधील बदल केवळ जेव्हा लाभधारक दस्तऐवज अपलोड केले जातात तेव्हा वैध मानले जातील. जर एखादी संस्था बंद असेल तर कागदपत्रांसह पगाराची स्लिप, नियुक्तीपत्र आणि पीएफ स्लिप असेल. (taxpayers 5 tax related tasks you need to complete before march 31)

संबंधित बातम्या –

LIC मध्ये करा 1 लाखाची गुंतवणूक, एकत्र 20 लाख परत मिळण्याची गॅरंटी

आता Cheque bounce करणं पडेल महागात, वाढत्या प्रकरणांमुळे कोर्टाचा मोठा निर्णय

Gold Silver Price : सोनं-चांदी झाली स्वस्त; वाचा पुढे सोनं वधारेल की आणखी घसरेल

(taxpayers 5 tax related tasks you need to complete before march 31)