TCS बनली जगातील तिसरी मूल्यवान कंपनी, रिलायन्सला टाकलं मागे

| Updated on: Jan 27, 2021 | 11:01 PM

ब्रान्ड फायनान्सच्या अहवालानुसार तिसच्या क्रमांकावरील TCS आणि दुसऱ्या क्रमांकावरील IBM या कंपन्यामंधील अंतर झपाट्याने कमी होत आहे.

TCS बनली जगातील तिसरी मूल्यवान कंपनी, रिलायन्सला टाकलं मागे
Follow us on

मुंबई : ब्रान्ड फायनान्सच्या रिपोर्टनुसार टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस म्हणजे TCS जगातील तिसरी सर्वात मूल्यवान आयटी कंपनी बनली आहे. आता TCS च्या पुढे Accenture आणि IBM या दोन कंपन्या आहेत. ब्रान्ड फायनान्सनं दिलेल्या अहवालानुसार जगातील प्रमुख 10 कंपन्यांमध्ये भारतातील 4 कंपन्यांचा समावेश आहे. त्यात TCS, Infosys, HCL आणि Wipro या कंपन्यांचा समावेश आहे.(TCS became the third most valuable company in the world)

ब्रान्ड फायनान्सच्या अहवालानुसार तिसच्या क्रमांकावरील TCS आणि दुसऱ्या क्रमांकावरील IBM या कंपन्यामंधील अंतर झपाट्याने कमी होत आहे. TCS चे ब्रान्ड मूल्य 11 टक्क्यांनी वाढून 15 अब्ज अमेरिकन डॉलर झालं आहे. TCS च्या मुख्य सेवांची मागणी वाढण्यासह त्यांच्या आयही वाढली आहे. TCSने एकट्याने 2020च्या चौथ्या तिमाहीत 6.8 अब्ज डॉलरचं काम मिळवलं आहे. कंपनीने युरोपीय आणि अमेरिकेच्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तसंच पुढील वर्षात याचा अधिक लाभ होईल अशी आता कंपनीला आहे.

Accenture चा जगात पहिला क्रमांक

Accenture ने 26 अब्ज डॉलरच्या ब्रान्ड मूल्यासह जगातील सर्वात मूल्यवान आणि सर्वात मजबूत आयटी सेवा ब्रान्डचा दर्जा कायम ठेवला आहे. तर IBM 16.1 अब्ज डॉलर ब्रान्ड मूल्यासह दुसख्या स्थानावर आहे. अहवालानुसार ब्रान्ड मूल्याच्या आधाराने Infosys चौथ्या, HCL सातव्या तर Wipro नवव्या स्थानावर आहे.

भारतात सर्वात मूल्यवान कंपनी बनली TCS

बुधवारी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे TCSच्या शेअरमध्येही 0.89 टक्के घसरण झाली आहे. या कंपनीचा शेअर आज 3 हजार 261 रुपयांवर बंद होणार आहे. आज कंपनीचं टोटल मार्केट कॅप 12 लाख 23 हजार 671 कोटी रुपये आहे. मार्केट कॅपनुसार आज TCS भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे. सततच्या घसरणीमुळे रिलायन्सला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे रिलायन्सचा नंबर घसरला आहे. आज रिलायन्सचा शेअर 2.29 टक्क्याच्या घसरणीसह 1895 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा मार्केट कॅप 12 लाख 1 हजार 482 कोटी रुपये आहे. मार्केट कॅपनुसार TCS ही रिलायन्सपेक्षा 22 हजार कोटी रुपयांनी पुढे गेली आहे.

संबंधित बातम्या :

TCS जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर; आता सामान्यांना काय होणार फायदा?

गेल्या तिमाहीत अंबानींनी जिओत किती कमावलं? वाचा सविस्तर

TCS became the third most valuable company in the world