यंदा नोकरीच्या प्रचंड संधी! PhonePay कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करणार, 2800 जणांना रोजगार मिळणार

| Updated on: Apr 06, 2022 | 2:58 PM

एप्रिल-जून या तिमाहीत 54 टक्के कंपन्या नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देणार आहे. देशातील 21 प्रदेशांत कार्यरत असलेल्या 796 लघु, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे.

यंदा नोकरीच्या प्रचंड संधी! PhonePay कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करणार, 2800 जणांना रोजगार मिळणार
महाराष्ट्र डाक विभागात नोकरी !
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कोविडची (COVID -19) मारकता कमी झाल्याने जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. कार्यालये, कचेऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रतिभेची मागणी वाढत असताना, 54 टक्के कंपन्यांनी चालू तिमाहीत नोकऱ्यांची चंगळ असणार आहे. टीमलीज सर्व्हिसेसने (team lease report)आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल-जून या तिमाहीसाठी तयार केलेल्या एम्प्लॉयमेंट आउटलूक अहवालानुसार (employment outlook report) या तिमाहीत नोकरभरतीची लाट येणार आहे. एप्रिल-जून या तिमाहीत 54 टक्के कंपन्या नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देणार आहे. देशातील 21 प्रदेशांत कार्यरत असलेल्या 796 लघु, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीच्या तुलनेत ही संख्या 4 टक्क्यांनी अधिक असणार आहे.

टीमलीजचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष रितुपर्णा चक्रवर्ती म्हणाले, “कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत घेणे आणि सकारात्मक आर्थिक विकासाच्या अंदाजांसह सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभावान लोकांची मागणी वाढत आहे. 14 हून अधिक क्षेत्रांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा आहे. आता प्रत्येक विभाग सक्रियपणे काम करत असून कोविडमुळे आलेला सुस्तपणा आणि नैराश्याचे ढग हटले आहेत. देशातील 21 प्रदेशांत कार्यरत असलेल्या 796 लघु, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे.

डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करणार फोनपे

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करेल, त्यामुळे कर्मचा-यांची संख्या 5,400 वर जाईल. सध्या कंपनीकडे 2.600 कर्मचारी आहेत. येत्या 12महिन्यांत बंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली आणि देशाच्या इतर भागात सुमारे 2,800 लोकांना विविध पदांवर नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे, असे फोनपेने स्पष्ट केले आहे. या नियुक्त्या अभियांत्रिकी, उत्पादन, विश्लेषण, व्यवसाय विकास आणि विक्री विभागतील पदांवर केल्या जातील. इतर कंपन्या देत असलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन आणि इतर सोयी-सुविधा देत असल्याने इतर कंपन्यांपेक्षा फोन पे सोडून जाणा-यांची संख्या अंत्यत कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कंपनी कर्मचारी हिस्सा मालकी योजनेच्या (ESOP) माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याची संधी सर्व कर्मचाऱ्यांना मिळते. ‘फोनपे’चे मनुष्यबळ प्रमुख मनमीत संधू म्हणाले, ‘तंत्रज्ञानावर आधारित आणि सर्वांसाठी मूल्य निर्माण करणारी दीर्घकालीन शाश्वत संस्था आम्ही उभारत आहोत.

सुमारे दोन लाख रिक्त पदे

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून या कालावधीत सुमारे दोन लाख पदे रिक्त असतील, देशातील नऊ सेक्टरमधील 1,87,062 पदे रिक्त आहेत. नव्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणात (QES) ही बाब उघड झाली आहे. या कंपन्यांनी एप्रिल-जूनपर्यंत देऊ केलेल्या एकूण नोकऱ्यांच्या तुलनेत रिक्त जागांचा हा आकडा किंचित 0.6 टक्क्यांपेक्षा थोडा अधिक आहे. नऊ सेक्टरमध्ये 30.8 दशलक्ष लोक नोकरी करतात. यामध्ये उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, आयटी/बीपीओ आणि वित्तीय सेवा यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे मध्ये बंपर भरती ! परीक्षा न देताच मिळणार नोकरी

Govt.Jobs : पदवीधारकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

Job Offers: सैनिक शाळेत वॉर्डबॉय आणि इतर अनेक पदांसाठी भरती, 19 हजार 900रुपयांपर्यंत मिळणार पगार

मोठी राजकीय घडामोड : पाहा व्हिडीओ