टेक कंपन्यांच्या दिग्गजांना कोणापासून भीती? सिक्युरिटीवर खर्च केले 369 कोटी रुपये, अचानक काय झाले

कॉर्पोरेट जगतातील दिग्गजांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक दिग्गज टेक कंपन्यांच्या सीईओंच्या सुरक्षेवर भरमसाठ पैसा खर्च होत आहे.

टेक कंपन्यांच्या दिग्गजांना कोणापासून भीती? सिक्युरिटीवर खर्च केले 369 कोटी रुपये, अचानक काय झाले
Tech giants at risk? Spent Rs 369 crore on security
| Updated on: Aug 25, 2025 | 9:46 PM

टेक्नॉलॉजी सेक्टरचे दिग्गज स्वत:च्या सुरक्षेसंदर्भात खुपच सर्तक झाले आहेत. टेक कंपन्यांचे मालक स्वत:च्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. साल 2024 मध्ये जगातील 10 सर्वात मोठ्या टेक फर्म्सनी त्यांच्या सीईओ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेवर अंदाजे 369 कोटी रुपये खर्च केले आहेत. मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांच्या सुरक्षेवर 221 कोटी रुपये खर्च केले आहेत.

टेक्नॉलॉजी सेक्टरच्या प्रमुख पदावर बसलेले दिग्गज लोक केवळ स्वत:च्या व्यवसायाची चिंता करत नाहीत तर स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबाची देखील खूपच काळजी घेत आहेत. हेच कारण आहे की टेक कंपन्यांचे मालक स्वत:च्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.

या दिग्गजांकडे अब्जावधी डॉलरची संपत्ती आहे. तसेच वाढते सार्वजनिक जीवन, सामाजिक आणि राजकीय प्रभावामुळे त्यांना जागतिक टीका आणि संभावित हल्ल्यांच्या केंद्रस्थानी आणले आहे. यामुळे टेक कंपन्याचे दिग्गज खाजगी सुरक्षेवर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत.

साल 2024 मध्ये जगातील 10 सर्वात मोठ्या टेक फर्म्सनी त्यांचे सीईओ आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या सुरक्षेवर अंदाजे 369 कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केले आहेत. यात सर्वाधिक पैसे मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबांच्या संरक्षणासाठी खर्च झाले आहेत.

झकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेवर कंपनीने 221 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या पॅलो आल्टो स्थित घराची सुरक्षा आणि प्रवासादरम्यान खाजगी सुरक्षा टीमची तैनाती. हायटेक सर्विलान्स आणि डिजिटल सुरक्षा सेवा यांचा समावेश आहे.

झकरबर्ग का आहेत निशाण्यावर ?

झकरबर्ग यांची सार्वजनिक प्रोफाईल आणि मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्यामुळे अनेक वर्षांपासून जन भावनांचे मुद्दे आणि राजकीय टीका आणि वैयक्तिक टीकेमुळे केंद्र स्थानी आहे. फेसबुक डेटा गोपनियता, निवडणूकांत हस्तक्षेप आणि फेक न्यूज पसरवण्यासारख्या गंभीर मुद्यांमुळे त्यांची सुरक्षितता प्राथमिकता बनली आहे.

टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्या सुरक्षेचे प्रकरण देखील मागे नाही. त्यांच्यावर सुरक्षेवर खर्च केलेल्या रकमेचा आकडा सार्वजनिक केला नसला तरी साल 2023 मध्ये त्यांच्यासुरक्षेवर टेस्लाने 21 कोटी रुपये खर्च केले होते.

मस्क यांना किती सुरक्षा

इलॉन मस्क यांची सुरक्षा त्यांची एक प्रायव्हेट सिक्युरिटी फर्म करीत असते. त्यांच्या सोबत नेहमी 20 बॉडीगार्ड्सचा ताफा असतो. त्यांचे वादग्रस्त ट्वीट, जागतिक परिस्थितीवर केलेली टीका आणि विविध देशांशी संघर्षामुळे त्यांच्या जीवनाला नेहमीच धोका असतो.

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या सुरक्षेवर कंपनी दरवर्षी सुमारे १३ कोटी रुपये खर्च करते. परंतू आता ते सीईओ नाहीत. परंतू त्यांची प्रोफाईल आणि प्रभाव जागतिक स्तरावर आहे. सध्याचे सीईओ एंडी जासी यांच्या सुरक्षेचा खर्चही वाढता आहे.

एनवीडियाच्या सीईओना धोका ?

एनवीडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांची कंपनी आर्टीफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात अग्रणी असून त्यांच्या सुरक्षेवर साल 2024 मध्ये 29कोटी रुपये खर्च केले होते. त्याची 13 लाख कोटीहून अधिक संपत्ती आणि जागतिक धोरणातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बँकींग क्षेत्रातील दिग्गज जेपी मॉर्गन चेस कंपनीचे सीईओ जेमी डाइमोन यांच्या सुरक्षेवर साल 2024 मध्ये 7.2 कोटी रुपये खर्च झाले होते. पेलांटिर टेक्नॉलॉजीचे सीईओ एलेक्स कार्प यांनी इस्राईल आणि अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाशी काम केल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती.

2024 घडली होती मोठी घटना

2024 मध्ये यूनायटेड हेल्थकेयरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर मारेकऱ्यांना मोठे समर्थन मिळाले होते. त्यामुळे जागतिक कॉर्पोरेट जगतात सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीरपणे घेतला जात आहे.