कोकिलाबेन अंबानी यांच्या तब्येतीत अचानक बिघाड,HN रिलायन्स रुग्णालयात दाखल
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन अंबानी ( वय 91 वर्ष) यांची तब्येत शुक्रवारी सकाळी अचानक बिघडल्याने त्यांना दक्षिण मुंबईतील हिरानंदानी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल केले आहे.

देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी ( वय 91 वर्ष ) यांची तब्येत शुक्रवारी सकाळी अचानक बिघडल्याने त्यांना दक्षिण मुंबईतील हिरानंदानी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे रुग्णालय अंबानी कुटुंबाचे आहे. या त्यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आलेली नाही. परंतू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त वय असल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे.
रुग्णालयात अंबानी कुटुंब दाखल
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे दोन्ही पूत्र मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या सह संपूर्ण कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली. सोशल मीडियावर अंबानी परिवार रुग्णालयात आल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कुटुंबातील लोक रुग्णालयात दाखल होताना दिसत आहेत.
कोकिलाबेन अंबानी यांची संपत्ती
कोकिलाबेन अंबानी या देशातील सर्वात मोठ्या रियालन्स सुमहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1934 मध्ये जामनगर गुजरात येथे झाला. त्याचा विवाह 1955मध्ये धीरुभाई अंबानी यांच्याशी झाला. मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दिव्यती सल्गाओकर अशी चार मुले त्यांना आहेत. कोकिलाबेन यांच्या वैयक्तिक संपत्ती सुमारे 18,000 आहे.त्यांच्याजवळ Reliance Industries मध्ये सुमारे 1.57 कोटी शेअर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कंपनीची 0.24%हिस्सेदारी आहे. मुकेश अंबानी यांच्या तुलनेत हा दुप्पट हिस्सेदारी आहे.
धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात संपत्ती वाटपावरुन मतभेद झाले होते. तेव्हा कोकिलाबेन यांनी पुढे येत हा तंटा सोडवला. त्यांनी दोन्ही मुलांची जबाबदारी आणि संपत्तीचे योग्य प्रकारे वाटप केले. त्यानंतर कुटुंबातील मतभेद मिटले. कोकिला बेन या त्यांच्या मोठा मुलगा मुकेश सोबत एंटीलिया येथे राहातात.
