Richest : भारतात श्रीमंतांचा आकडा वाढला हो! किती आहेत आता धनकुबेर, त्या अहवालातील दावा काय?

Knight Frank Global Wealth Report 2025 : नाईट फ्रँकने भारतात श्रीमंतांचा आकडा वाढल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. देशात हाय नेटवर्थ इंडिविजुअल्स म्हणजे स्वतंत्र श्रीमंतांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Richest : भारतात श्रीमंतांचा आकडा वाढला हो! किती आहेत आता धनकुबेर, त्या अहवालातील दावा काय?
श्रीमंतांची यादी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 11, 2025 | 1:39 PM

भारतीय अर्थव्यवस्था सध्या सुसाट आहेत. सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून देशाने मानाचा किताब पटकवला आहे. तर आता श्रीमंतांच्या आकड्यातही आघाडी घेतली आहे. देशात श्रीमंतांचा टक्का वाढला आहे. नाईट फ्रँक ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2025 मध्ये याविषयीचा दावा करण्यात आला आहे. प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्मने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, भारत हा जागतिक संपत्ती हब म्हणून समोर येत आहे. देशात श्रीमंतांची टक्केवारी सतत वाढत आहे. या अहवालानुसार आता हा आकडा 85,698 इतका आहे. श्रीमंतांची संख्या पाहता भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.

जगातील या तीन देशात सर्वाधिक श्रीमंत

या अहवालानुसार, श्रीमंतांच्या संख्येचा विचार करता, भारतासमोर तीन देश आहेत. या तालिकेत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन तर तिसऱ्या स्थानी जपान हा देश आहे. देशात श्रीमंतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. नाईट फ्रँक अहवालात याविषयीची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी थांबणार नसल्याचे अहवाल सांगतो. 2028 पर्यंत भारतातील श्रीमंतांची संख्या वाढून 93,758 इतकी होईल.

अब्जाधीशांच्या प्रकरणात तिसर्‍या क्रमांकावर

भारतात स्वतंत्र श्रीमंतांची संख्या वाढत आहे. भारत अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. देशातील अब्जाधीशांची संख्येत वाढ झाली आहे. या अहवालानुसार, वर्ष 2024 मध्ये 12 टक्क्यांची वाढ होऊन 191 झाली आहे. भारतीय अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीचा विचार करता ही रक्कम 950 अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिका आणि चीननंतर जागतिक स्तरावर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

इतके कोटी असतील तर श्रीमंतांच्या यादीत

बिझनेस टुडेच्या एका अहवालानुसार, भारतात सर्वाधिक श्रीमंत लोकांचा चमूत सहभागी होण्यासाठी 1.52 कोटींची गरज आहे. टॉप 1 टक्के श्रीमंतांच्या यादीत एंट्री लिमिट जागतिक मानकांनुसार ठरवण्यात येते. जगभरात एकूण 3.7 टक्के अतिश्रीमंत आहेत. भारतात श्रीमंतांचा हा आकडा 85,698 इतका आहे. 2028 पर्यंत भारतातील श्रीमंतांची संख्या वाढून 93,758 इतकी होईल. भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. भारताने जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.