Crypto : क्रिप्टोच्या मोहमायापासून रहा दूर, गुंतवणूकदारांचे तोंडचे पाणी पळाले, कोट्यवधींचे साम्राज्य धराशायी..

| Updated on: Nov 23, 2022 | 8:37 PM

Crypto : क्रिप्टोच्या मोहमायापासून सध्या दूर रहाण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत..पण इतर करन्सींची कामगिरी जोरदार सुरु आहे. 

Crypto : क्रिप्टोच्या मोहमायापासून रहा दूर, गुंतवणूकदारांचे तोंडचे पाणी पळाले, कोट्यवधींचे साम्राज्य धराशायी..
गुंतवणूक करताना सावध रहा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : आज क्रिप्टो करन्सी बाजारात (Cryptocurrencies Market) जोरदार तेजी दिसून येत असली तरी हा बुडबुडा किती दिवस टिकेल हा प्रश्न आहेच. कारण आठवडाभरात एफटीएक्स प्रकरणाने (FTX Case) गुंतवणूकदारांना मोठा धडा दिला आहे. त्यामुळे हा बाजार गुंतवणूकदारांसाठी (Investors) किती फायदेशीर आहे, यापेक्षा तो किती विश्वासर्हय आहे, हे महत्वाचे आहे.

गेल्या आठवड्यात जगभरातील टॉप 50 क्रिप्टोमधील 8 चलन अशी आहेत की, त्यामध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. या यादीत पोल्काडॉट, यूनिस्वॅप आणि सोलाना यांची नावे आहेत.

बुधवारी क्रिप्टो मार्केट 4 टक्के तेजीसह व्यापार करत होते. बिटकॉईन, इथेरियम, बीएनबी यासारख्या अभासी चलनात 5 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. त्यामुळे या गुंतवणूकदारांना या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हायसे वाटले.

हे सुद्धा वाचा

जगातील सर्वात लोकप्रिय करन्सी बिटकॉईनमध्ये आज जवळपास 5 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. त्यामुळे या चलनाचा आजचा भाव 16,480 डॉलरवर पोहचला. तर गेल्या आठवड्यात बिटकॉईन 2.07 टक्क्यांनी घसरले होते.

इथेरियमच्या भावात 6 टक्क्यांहून अधिकची वृद्धी दिसून आली. पण एकाच आठवड्यात त्यामध्ये 7 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. बीएचबी फायनान्समध्ये 7 टक्क्यांची तेजी दिसून आली. आठवडाभरात हे चलन जवळपास 2 टक्क्यांनी घसरले.

डॉगेकॉईन ही सूसाट आहे. या चलनात 8 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. हे चलन सध्या 0.08137 डॉलरवर व्यापार करत आहे. पण यामध्ये ही आठवडाभरात जवळपास 9 टक्क्यांची घसरण झाली.

लाईट कॉईनने इतर चलनापेक्षा चांगले पुनरागमन केले आहे. आज या करन्सीत 28.32 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. आठवडाभरात या चलनात 33.55 टक्क्यांची तेजी दिसून आली.

जागतिक क्रिप्टो करन्सी कॅप सध्या 820.14 दशलक्ष डॉलरवर पोहचले आहे. पण काही दिवसांपासून हा बाजार सातत्याने घसरणीला होता. यामध्ये जवळपास एक ट्रिलियनची डॉलरची घसरण झाली.