Today petrol, diesel rates : कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

| Updated on: Jun 15, 2022 | 7:37 AM

कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले. जाणून घेऊयात राज्यासह देशाच्या प्रमुख शहारातील पेट्रोल, डिझेलचे भाव.

Today petrol, diesel rates : कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
आजचे पेट्रोल, डिझेल रेट
Follow us on

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil price) वाढ सुरूच आहे. आज कच्च्या तेलाचे दर 123 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ सुरू असताना देखील भारतात पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे, मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर वाढत नसल्याने याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसताना दिसून येत आहे. सध्या भारताला रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या दरात तीस टक्के सूट देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत रशियाकडून मोठ्याप्रमाणात कच्चे तेल आयात करण्यात येत आहे. यामुळे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

प्रमुख महानगरातील दर

पेट्रोलियम कपंन्यांनी आज जारी केलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबई पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये लिटर असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना केल्यास सर्वात महाग पेट्रोल मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त पेट्रोल दिल्लीमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

मे महिन्यात रशियाकडून 16 टक्के कच्च्या तेलाची आयात

रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून सध्या भारताला सवलतीच्या दरात कच्चे तेल मिळत आहे. रशियाने भारताना कच्च्या तेलाच्या किमतीवर तीस टक्के सूट दिली आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीचा धडाका लावला आहे. मे महिन्यात भारताने रशियाकडून जवळपास 2.5 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. कच्च्या तेलाच्या एकूण आयातीच्या तुलनेत हे प्रमाण 16 टक्के एवढे आहे. भारत जगातील तीसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे.