Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

| Updated on: Jun 05, 2022 | 11:55 AM

आज कच्च्या तेलाच्या दरात थोडी तेजी दिसत असून, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात पेट्रोल, डिझेलचे भाव

Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
आजचे पेट्रोल, डिझेल दर
Follow us on

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. कच्च्या तेलाच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. शनिवारी कच्च्या तेलाचे दर 114 डॉलर प्रति बॅरल इतके होते. तर आज ते प्रति बॅरल 119 डॉलरवर पोहोचले आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या भावानुसार राज्यात पेट्रोल, डिजेलच्या किमती स्थिर आहेत. आज नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 111.41 रुपये आहे तर डिझेलचा भााव प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर अनुक्रमे 111. 30 आणि 98 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे.

हे सुद्धा वाचा

कच्च्या तेलाच्या दरात तेजीचे संकेत

कच्च्या तेलाचे दर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेले दोन दिवस कच्च्या तेलाच्या दरात थोडी घसरण पहायला मिळत आहे. मात्र तरी देखील कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 119 डॉलर एवढे प्रचंड आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून युद्ध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि काही युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यांनी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात देखील पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर वाढत असताना देखील भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत.