Rate Hike : टमाट्याने खाल्ला भाव, बटाट्याच्या वाकूल्या, भाज्यांमुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला..

| Updated on: Oct 29, 2022 | 8:34 PM

Rate Hike : दिवाळीपासून भाजीपाल्यानेही सर्वसामन्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. देशातील अनेक भागात भाव वाढले आहेत..

Rate Hike : टमाट्याने खाल्ला भाव, बटाट्याच्या वाकूल्या, भाज्यांमुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला..
दरवाढीचा फटका
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : बटाटे (Potato), टमाटे (Tomato) आणि कांदा हा स्वयंपाक घरातील रोजचा अत्यावश्यक घटक आहे. सध्या भाजीपाल्याच्या (Vegetable) किंमती वाढल्या आहेत. त्यात टमाटे, बटाटे आणि कांद्याच्या भाव वाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहे. त्यातच टमाट्याचे उत्पादन 4 टक्के आणि बटाट्याचे उत्पादन 5 टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) व्यक्त केला.

यंदा, टमाट्याचे उत्पादन 2 कोटी 3 लाख टन राहण्याची शक्यता आहे. तर गेल्या वर्षी टमाट्याचे एकूण उत्पादन 2 कोटी 11 लाख होते. कृषी मंत्रालयाने फलोत्पादनाविषयीचे आकडे आणि अंदाज वर्तविल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

टमाट्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीपासूनच टमाट्याचे दर वाढायला सुरुवात झाली होती. सध्या टमाट्याचे भाव 80 रुपये किलो झाले आहेत. दिवाळीपर्यंत पावसाचे सावट होते. त्यामुळे टमाट्यांचे मोठे नुकसान झाले.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे टमाट्याचे उत्पादन घटले. तर दुसरीकडे सणांमुळे आणि उत्पादन घटल्याचा फटका ग्राहकांना बसला. टमाट्याचे भाव झपझप वाढले. एक किलो टमाट्यासाठी आता 80 रुपये मोजावे लागत आहेत. तर येत्या काही दिवसात दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकड्यानुसार, बटाट्याचे उत्पादनही घटणार आहे. 2021-22 दरम्यान बटाट्याच्या उत्पादनात 5 टक्क्यांची घसरण झाली होती. यंदा बटाट्याचे उत्पादन 5 कोटी 33 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी बटाट्याचे उत्पादन 5 कोटी 61 लाख टन झाले होते.

यंदा काद्याचे दर अचानक वाढले आहेत. पण काद्यांचे उत्पादन जास्त राहणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, देशात 3 कोटी टन काद्यांचे उत्पादन होईल. तर गेल्या वर्षी 2 कोटी 66 लाख टन काद्यांचे उत्पादन झाले होते.