नवी दिल्ली : सध्या भारतात महागाई (Inflation) हा महत्वाचा मुद्दा झाला आहे. सर्वसामान्यांना गेल्या एक वर्षांपासून महागाईचा सामना करावा लागत आहे. घरगुती गॅसच्या (LPG Gas Cylinder) किंमती हजारांच्यावर, तर पेट्रोल-डिझेलचे भावही (Petrol-Diesel Rate) प्रचंड वाढले आहेत. जीएसटीच्या परिघात अनेक खाद्य पदार्थ आणि अन्नधान्य आल्याने शहरी भागात त्याची झळ बसत आहे. पण एवढीच कारणं महागाई वाढीमागे आहेत का?