TV9 ट्रॅव्हल अँड टुरिझम समिट: पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्योजकांचा सन्मान

TV9 नेटवर्क ट्रॅव्हल अँड टुरिझम समिट 2025 मध्ये भारतात भरभराटी आलेच्या पर्यटन क्षेत्रावर प्रकाश टाकण्यात आला. भविष्यात विकासाला चालना देण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाची महत्त्वपूर्ण भूमिका यावेळी विषद करण्यात आली.

TV9 ट्रॅव्हल अँड टुरिझम समिट: पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्योजकांचा सन्मान
| Updated on: Aug 26, 2025 | 4:33 PM

गुण्यागोविंदाने नांदत आहेत. येथील प्रत्येक राज्याबरोबर तेथील भूगोल आणि लोकसंख्येचे शास्त्र बदलते आणि येथे निसर्ग त्याचे सर्वात भव्य रूप दाखवतो. म्हणूनच, अलिकडच्या वर्षांत भारत अभूतपूर्व भरभराटीने पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनला आहे. TV9 नेटवर्क ट्रॅव्हल अँड टुरिझम समिट: आयकॉनिक अवॉर्ड्स 2025 ने अलिकडच्या वर्षांत आपल्या देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीला प्रोत्साहन दिले आहे. या समिटला अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्यांनी वेगाने विकसित होत असलेल्या पर्यटन उद्योगाच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल त्यांचे मौल्यवान विचार मांडले.

घरगुती पर्यटन भारताची सर्वात मोठी ताकत: गजेंद्र सिंह शेखावत

घरगुती पर्यटन ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. जी देशाला जागतिक प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत एक अनोखा लाभ प्रदान करते असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की दुबई, सिंगापुर आणि थायलँड सारखे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते.तेच त्यांच्याजवळ घरगुती आधार खूपच मर्यादित आहे.जेव्हा भारतात हा आधार खुप व्यापक आणि मजबूत आहे.

पर्यटन भारताच्या भविष्याच्या वृद्धीचे इंजिन बनेल – अमिताभ कांत

येता काळ हा पर्यटन भारताच्या विकासाचे सर्वात मोठी विकासाचे इंजिन बनणार असून त्यामुळे 2.5 कोटी नोकऱ्या निर्माण होतील असे निती आयोगाचे माजी सीईओ आणि G20 शेरपा अमिताभ कांत यानी सांगितले. जर भारताला वेगाने पुढे जायचे असेल तर ट्रॅव्हल, टुरिझम आणि क्रिएटीव्हीटीत उत्कृष्टता गरजेचे आहे असेही सांगितले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साल 2047 पर्यंत $30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दीष्ठता पर्यटन क्षेत्राची भूमिका महत्वाची असेल असे निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले.

इंडिगोला ‘आयकॉनिक एक्सलन्स इन एव्हीएशन अवॉर्ड’

या सोहळ्यात इंडिगो एअरलाईन्सला ‘आयकॉनिक एक्सलन्स इन एव्हीएशन अवॉर्ड’ने गौरवण्यात आले. हा पुरस्कार त्यांना भारताच्या सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी एअरलाईन कंपनी म्हणून वाजवी दरात सेवा, वेळेचे अचुक पालन आणि ग्राहकांच्या काळजीबद्दल देण्यात आले आहे. इंडिगोच्या वतीने हा पुरस्कार विनय बालोत्रा आणि अंशु सेठी यांनी स्वीकारला. बालोत्रा याच्या VFS मध्ये केलेल्या कामगिरीचा देखील यावेळी उल्लेख करण्यात आला.

विशेष वक्ते आणि पॅनलिस्टचा सहभाग

टीव्ही 9 नेटवर्कचे ट्रॅव्हल एण्ड टूरिझम समीटची सुरुवात एका चर्चासत्राने झाली आणि त्यात खालील वक्त्यांचा सहभाग होता. MSME बिझनस फोरम इंडियाचे संचालक रवि नंदन सिन्हा, VFS ग्लोबलचे ऑपरेशन्स युम्मी तलवार, इंडिगोचे हेड ऑफ सेल्स अंशुल सेठी, एमिटी यूनिव्हर्सिटीचे डीन (हॉस्पिटॅलिटी एंड टूरिझम) प्रो. डॉ. मनोहर सजंनी, ग्लोबल हेड ऑफ ट्रॅवल एंड एक्सपेंस (T&E) राजदेव भट्टाचार्य यांचा समावेश होता.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्यटन

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्यटन या चर्चासत्रात वक्त्यांनी सांगितले की एआय डेटा एनालिटिक्स आणि तंत्रज्ञान विकास प्रवासाचा अनुभव प्रत्येक अंगाने कसा बदलत आहे यावर सांगितले. या सत्रात संदीप द्विवेदी, कार्तिक शर्मा, राजेश मॅगो, हरीश खत्री, ज्योती मायल, रक्तिम दास यांनी सहभाग घेतला.