आता UPI मधून गोल्ड, एफडी अन् प्रॉपर्टी लोनचे पैसे काढता येणार, केंद्र सरकारचा निर्णय

यूपीआय पेमेंट सिस्टमला सोपी बनवण्यासाठी एनपीसीआयकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सध्या यूपीआय यूजर फक्त त्यांचे बचत खाते किंवा ओव्हरड्राफ्ट खाते लिंक करू शकतात. याद्वारेच पेमेंट करता येते.

आता UPI मधून गोल्ड, एफडी अन् प्रॉपर्टी लोनचे पैसे काढता येणार, केंद्र सरकारचा निर्णय
UPI
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jul 21, 2025 | 8:34 AM

केंद्र सरकारने यूपीआय यूजर्सला चांगली बातमी दिली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) UPI च्या नियमात बदल केले आहे. आता यूपीआय यूजर्स गोल्ड लोन, बिजनेस लोन किंवा एफडीची रक्कम काढता किंवा भरता येणार आहे. हे लोन अकाउंट यूपीआय अकाउंटला लिंक करण्यात येणार आहे. आता यूपीआय अ‍ॅप Paytm, Phonepe, Google Pay च्या माध्यमातून क्रेडिट कार्डपासून बिजनेस लोनपर्यंत पेमेंट करु शकणार आहे. हा नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.

लोनचे व्यवहार ऑनलाइन शक्य

यूपीआय पेमेंट सिस्टमला सोपी बनवण्यासाठी एनपीसीआयकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
सध्या यूपीआय यूजर फक्त त्यांचे बचत खाते किंवा ओव्हरड्राफ्ट खाते लिंक करू शकतात. याद्वारेच पेमेंट करता येते. काही RuPay क्रेडिट कार्ड देखील यूपीआयला जोडलेले आहेत. परंतु त्यांची संख्या कमी आहे. आता नवीन नियमाने गोल्ड लोन, पर्सनल लोनचे पैसे बँकेत न जाता यूजर ऑनलाइन माध्यमातून काढता येणार आहे.

यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही कोणते पेमेंट करु शकणार आहे, त्यासंदर्भात बँक निर्णय घेणार आहे. ही सुविधा लहान व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर असणार आहे. हे व्यापारी २ ते ३ लाख रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेतात. त्या लोकांना पेमेंट करण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागणार नाही.

यूपीआयच्या नवीन नियमात यूजर पी2पी सोबत पी2पीएम व्यवहार करु शकणार आहे. तसेच रोकड रक्कमही काढता येणार आहे. त्यासाठी एनपीसीआयने काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. सध्या यूजर एका दिवसांत एक लाखांपर्यंत पेमेंट करु शकणार आहे. तसेच एका दिवसात रोकड १० हजारांपर्यंत काढता येणार आहे. तसेच पी2पी नियमित व्यवहारांची लिमिट २० केली आहे.

एनपीसीआय वेबसाइटनुसार, यूपीआयवरील प्री-मंजूर क्रेडिट लाइन तुम्हाला तुमच्या बँकेकडून प्री-मंजूर क्रेडिट लाइन मिळवण्याची परवानगी देणार आहे. यामुळे तुम्ही तुमच्या यूपीआयशी लिंक करून त्वरित व्यवहार करू शकता. क्रेडिट लाइन ही मुळात पूर्व-निर्धारित रक्कम असते जी तुम्ही कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकता आणि ती तुमच्या उत्पन्नावर आणि क्रेडिट पात्रतेवर आधारित निश्चित केली जाते.