देशातील UPI Payment System ही जगातील काही देशात पोहचली आहे. तिथे युपीआय ॲपच्या मदतीने पेमेंट करता येते. देशात स्मार्टफोनवर, अथवा बारवरील QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट करण्यात येते. पण ज्यांच्याकडे बँकेचे खाते आहे. पण स्मार्ट मोबाईल नाही, त्यांना हा या सुविधेचा लाभ घेता येत नाही. त्यांच्यासाठी एक खास पाऊल टाकण्यात आले आहे. स्टार्टअप प्रॉक्सी या कंपनीने ThumbPay या नावाने त्यांचे उत्पादन बाजारात आणणार आहे. बायोमॅट्रिक ऑथेटिंकेशनचा वापर करून पेमेंट करण्याची परवानगी यामाध्यमातून देण्यात येते. दुकान, मॉल्स, पेट्रोल पंप, शोरूमपासून तर अनेक ठिकामी केवळ अंगठ्याचा वापर करून नागरिकांना पेमेंट करता येईल. विशेष म्हणजे या युपीआय पेमेंटसाठी फोन, कार्ड अथवा डिजिटल वॉलेटची अजिबात गरज नाही. ग्राहकांना पेमेंटसाठी त्यांचा अंगठा केवळ डिव्हाईसवर ठेवावा लागेल. त्यानंतर त्यांच्या खात्यातून रक्कम वजा होईल.
कशी आहे ThumbPay पेमेंट प्रक्रिया?
ThumbPay चा वापर युझर्ला पेमेंट करण्यासाठी करता येईल. त्यासाठी त्यांचा अंगठा डिव्हाईसवर ठेवावा लागेल. हा अंगठा स्कॅन होईल. आधार सक्षम पेमेट सिस्टिम (AEPS) आधारे या अंगठ्या आधारे व्यक्तीची पडताळणी होईल. त्याचा पडताळा झाल्यानंतर युपीआय सिस्टिम बँक टू बँक पेमेंट पूर्ण करेल. यासाठी ग्राहकाला QR कोड, स्मार्टफोन अथवा रोख रक्कमेची गरज भासणार नाही.
वैयक्तिक सुरक्षा धोक्यात?
ही सुविधा चांगली असली तरी यामुळे ग्राहकाची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येणार नाही का? असा सवाल केला जात आहे. कारण कंपनी जरी वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेत असली. क्यूआर कोड बारमध्ये एका छोटासा कॅमेऱ्याने व्यक्तीची छबी जरी टिपत असली तरी एक मोठा धोका लोकांना वाटत आहे. ज्या ठिकाणी या युपीआय थम्बपे बारवर अंगठा लावला जाईल. तिथे या अंगठ्याच्या ठशांचा गैरवापर केला जाणार नाही याची काय शाश्वती आहे, असा सवाल केला जात आहे.
या थम्बपेची किंमत किती?
हे थम्बपे खरेदी करायचे असेल तर त्यासाठी दोन हजारांचा खर्च येतो. हे मशीन बॅटरी पॉवरवर सुरु असते. त्यामुळे ते मोठे शोरूम, लहान दुकाने आणि अगदी ग्रामीण भागातील दुकानांमध्ये सुद्धा वापरता येते. त्यासाठी इंटरनेटची मात्र गरज आहे. थम्बपे आधारशी जोडलेल्या बँक खात्याशी जोडल्या जाते. आधार कार्डशी जोडलेल्या बँका खात्यातून कोणत्याही डिव्हाईसवर ग्राहकांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पेमेंट करता येते. या उपकरणाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. UIDAI आणि NPCI कडून त्याला सुरक्षा उपाय योजनासंबंधीची मंजूरी मिळाल्यानंतर ते बाजारात दाखल होईल.