टोयोटा कारला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

टोयोटा किर्लोस्करचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

टोयोटा कारला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
| Updated on: Nov 30, 2022 | 9:40 AM

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर ग्रुपचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन (Vikram Kirloskar Passed Away) झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. ते 64 वर्षांचे होते. टोयोटा कारला (Toyota Car) लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्यात, लोकांच्या मनात या कारविषयी विश्वास आणि आवड निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या जाण्याने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे.

विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यांच्या जाण्यावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जातोय.

विक्रम किर्लोस्कर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बंगळुरूच्या हेब्बल स्मशानभूमीत दुपारी 1 वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येतील.

विक्रम किर्लोस्कर कोण होते?

विक्रम किर्लोस्कर हे इंजिनीअरिंग होते. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यांनी CII, SIAM आणि ARAI या कंपन्यांमध्ये काम केलंय.किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचं ते प्रतिनिधीत्व करत होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिले.सध्या ते टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष होते.

1888 मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर ग्रुपची स्थापना केली. या कुटुंबाचे आणि या उद्योग समुहाचे ते चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. टोयोटा कारला लोकांच्या मनात अग्रगण्य स्थान निर्माण करण्यात आणि हा व्यवसाय वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला.