Vodafone-Idea : वोडाफोन-आयडियाची साथ सोडत आहेत ग्राहक! नेमकं कारण काय?

| Updated on: Jan 24, 2022 | 1:14 PM

ग्राहक वोडाफोन-आयडियाची साथ का सोडत आहेत? या प्रश्नाचं पहिलं उत्तर हे खराब नेटवर्क असल्याचं सांगितलं जात आहे. एका अहवालानुसार या कंपनीच्या सक्रिय ग्राहकांमध्ये सलग 36 महिने कमी आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कंपनीला मागील वर्षात केवळ 14 लाख नवे 4जी ग्राहक जोडले गेले आहेत. या तुलनेत एअरटेलसोबत 3.4 कोटी तर जिओसोबत 2 कोटी नवे ग्राहक जोडले गेले आहेत.

Vodafone-Idea : वोडाफोन-आयडियाची साथ सोडत आहेत ग्राहक! नेमकं कारण काय?
वोडाफोन-आयडिया
Follow us on

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली टेलीकॉम कंपनी (Telecom Company) वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea)च्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अशा संकटाच्या काळात कंपनीचे ग्राहक कंपनीची साथ सोडताना दिसत आहेत. आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीला जवळपास 19 लाख ग्राहकांचं नुकसान झालं आहे. ग्राहकांबाबत मागील 5 महिन्यात कंपनीसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. या 19 लाखातील जवळपास 12 लाख ग्राहक (Mobile Customer) हे ग्रामीण भागातील होते, ज्यांनी वोडाफोन-आयडियाची साथ सोडली आहे.

ग्राहक वोडाफोन-आयडियाची साथ का सोडत आहेत? या प्रश्नाचं पहिली उत्तर हे खराब नेटवर्क असल्याचं सांगितलं जात आहे. एका अहवालानुसार या कंपनीच्या सक्रिय ग्राहकांमध्ये सलग 36 महिने कमी आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कंपनीला मागील वर्षात केवळ 14 लाख नवे 4जी ग्राहक जोडले गेले आहेत. या तुलनेत एअरटेलसोबत 3.4 कोटी तर जिओसोबत 2 कोटी नवे ग्राहक जोडले गेले आहेत.

मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर 13 टक्क्यांनी घटले

या कंपनीच्या शेअर्सच्या प्रदर्शनातही मोठा चढउतार राहिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर 13 टक्क्यांनी घटले आहेत. तर एक महिन्यात 21 टक्के, 3 महिन्यात 22 टक्के, एका वर्षात 7 टक्के, तर मागील वर्षात 50 टक्के रिटर्न दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते वोडाफोन-आयडियाने स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE ला सांगितलं की बोर्डाच्या बैठकीत स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते आणि एजीआरची संपूर्ण रक्कम व्याजासह भरण्यासाठी नवीन योजनेबाबत सहमती दर्शवली आहे. दरम्यान, कंपनी ही थकबाकी सरकारला स्टेकद्वारे देणार आहे. म्हणजेच व्होडाफोन-आयडियामध्ये सरकारची 35.86 टक्के भागिदारी असेल.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये नोव्हेंबर महिन्यात थोडी सुधारणा दिसली आहे. एअरटेलने जवळपास 13 लाख आणि जिओने 20 लाख नवे ग्राहक जोडले आहे. यात वोडाफोन-आयडियाची साथ सोडलेले ग्राहक अधिक असल्याचं मानलं जात आहे. मात्र, ट्राय जेव्हा डिसेंबरमधील ग्राहकांची संख्या जाहीर करेल तेव्हाच दरवाढीचा ग्राहकांवर काय परिणाम झाला हे कळेल.

कोटक इक्विटी रिसर्चच्या अहवालानुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2021 दरम्यान जिओने 42 लाख सदस्य जोडले होते. ऑक्टोबरमध्ये ही संख्या 18 लाख आणि नंतर नोव्हेंबरमध्ये 20 लाख इतकी होती.

एका अहवालानुसार भारतात जवळपास 118 कोटी लोक मोबाईलचे वापरकर्ते आहेत. तर जवळपास 76 कोटी लोक ब्रॉडबॅन्ड वापरतात. वोडाफोन-आयडियाचे जवळपास 25 कोटी ग्राहक आहेत. 2020 च्या तुलनेत कंपनीच्या वापरकर्त्यांमध्ये जवळपास 10 टक्क्यांनी घट झाली आहे. भारत सरकार या कंपनीत 35 टक्क्यांपेक्षा अधिक भागधारक बनले आहेत.

इतर बातम्या :

Goa Assembly Election : उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष लढणार, आता शिवसेना आपला उमेदवार माघारी घेणार?

Utpal Parrikar : माझ्या पार्टीच्या ऑफर स्वीकारल्या नाही, इतरांच्या काय घेणार?; शिवसेना, आपच्या ऑफरवर उत्पल यांचा सवाल