ATM मध्ये पैसे विसरुन आल्यावर काय करायचं? तुमच्या पैशाचं काय होतं?

| Updated on: Mar 26, 2021 | 7:01 PM

बर्‍याच वेळा एटीएममधून पैसे काढताना आपण चुकून कॅश विसरुन निघून जातो, अशा वेळी काय करायचं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. forget to collect cash from ATM

ATM मध्ये पैसे विसरुन आल्यावर काय करायचं? तुमच्या पैशाचं काय होतं?
एटीएम
Follow us on

मुंबई: एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) म्हणजे एटीएममधून पैसे काढणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु, एटीएममधून रोख पैसे काढताना चुका होतात. त्या चुकांचा भुर्दंड ग्राहकांना बसतो. कधीकधी काही अन्य कारणांमुळे ट्रान्झॅक्शन फेल होतं. बर्‍याच वेळा मशीनमध्येच कार्ड विसरुन जाते. परंतु बर्‍याच वेळा एटीएममधून पैसे काढताना आपण चुकून कॅश विसरुन निघून जातो, अशा वेळी काय करायचं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. (What we will do when we forget to collect cash from ATM)

पैसे विसरल्यास नुकसान ठरलेलं

बहुतेक एटीएम अशी आहेत की पैसे मिळेपर्यंत आपण मशीनमधून कार्ड काढू शकत नाही. परंतु, काही जुन्या एटीएममध्ये ही सोय उपलब्ध नाही. कार्ड स्वॅपिंगकरुन पैसे काढता येतात. अशा एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांकडून चूक होण्याची शक्यता असते. जर तुम्ही एटीएम कार्ड स्वॅप केलं नंतर माहिती भरली त्यानंतर चुकून कॅश घेण्यास विसरल्यास बँक जबाबदारी घेत नाही. तुम्ही कॅश कलेक्ट करण्यास विसल्यास त्याचा शोध लावण्यासाठी एकच मार्ग राहतो ते म्हणजे सीसीटीव्ही फुटेज होय.

बँकेत तक्रार करा

तुमच्याकडून अशी चूक झाल्यास तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत. तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र, तुम्ही अशावेळी बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. बँकेला तुमचा व्यवहार क्रमांक, तारीख आणि वेळ सांगा. एटीएमध्ये पैसे विसरण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे मनस्ताप होऊ नये, असं वाटत असेल तर, एटीएममधून बाहेर पडण्यापूर्वी दोनदा पैसे घेतलेत का पाहा आणि बाहेर पडा

काही वेळा पैसे मिळत नाहीत पण खात्यावरुन वजा होतात

बर्‍याच वेळाआपण एटीएममधून पैसे काढण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन पैसे बाहेर येण्याची वाट पाहतो. खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज येतो पण कॅश मिळत नाही. हा प्रकार तुमच्यासोबत घडल्यास घाबरु नका पुढील 24 ते 48 तासांच्या आत तुमच्या खात्यात पैसे परत जमा केले जातात. पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत तर, तुम्ही बँकेकडे तक्रार दाखल करा आणि व्यवहाराचा तपशील सांगा.

संबंधित बातम्या:

SBI च्या ATM वर 8 सुविधा मिळतात मोफत; आता दिवसभरात ‘एवढे’ काढता येणार पैसे

आपल्या व्हॅलेंटाईन किंवा पत्नीला ATM कार्ड देण्यापूर्वी काळजी घ्या; अन्यथा मोठं नुकसान

(What we will do when we forget to collect cash from ATM)