
FD Interest Rates: सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) नेहमीच सुरक्षित आणि गॅरंटीचा पर्याय मानला जात आहे. खासकरुन एक वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटला लोक जास्त पसंत करतात, काय कमी वेळेत चांगले व्याज आणि गरज पडल्यावर पैसे काढण्याची सुविधा अशा दोन्ही सुविधा मिळतात. चला तर पाहूयात देशातील प्रसिद्ध बँका एक वर्षांच्या एफडीवर किती व्याज देत आहेत.
जर तुम्हाला सुरक्षित आणि परताव्याची हमी असलेल्या योजनेत पैसे गुंतवायचे असेल तर मुदत ठेवी (FD) ही एक विश्वासार्ह गुंतवणूक योजना आहे. 2025 मध्ये, प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी बँका एक वर्षाच्या मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहेत.
देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँक एचडीएफसी बँकेत एक वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांसाठी 6.25 टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के व्याज मिळत आहे.
प्रायव्हेट सेक्टरची दुसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेत एक वर्षांची एफडी केल्यानंतर सर्वसामान्यांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज ऑफर केले जाते.
कोटक महिंद्रा बँक देखील एक वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्य लोकांना 6.25 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज ऑफर केले जाते.
फेडरल बँकेत एक वर्षांची एफडी केल्यानंतर सर्वसाधारण लोकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज दिले जाते.
देशाची सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक एक वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 6.25 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के वार्षिक व्याज मिळते.
पब्लिक सेक्टरची बँक असलेली युनियन बँक सर्वसामान्यांना एक वर्षांच्या एफडीवर 6.40 टक्के व्याज देते, तर सिनियर सिटीजन्सना 6.90 टक्के व्याज ऑफर करत असते.
सरकारी बँक कॅनरा बँक एक वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 6.25 टक्के व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के वार्षिक व्याज देत असते.
पंजाब नॅशनल बँक सर्व सामान्य नागरिकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज ऑफर करत आहे.
जर तुम्ही सुरक्षित रिटर्नसह निश्चित नफा मिळवू इच्छित असाल तर एक वर्षांची एफडी एक चांगला पर्याय आहे. परंतू गुंतवणूक करण्याआधी बँकांच्या व्याजदराची तुलना जरुर करा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कमाई होईल.