रतन टाटा यांचा राईट हँड म्हणून ओळख, एका दिवसाचा पगार ऐकून झोप उडेल; फ्लॅटचं भाडही…

रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. टाटा कंपनी त्यांच्यासाठी अतिशय खास आहे. रतन टाटा यांनी आता कंपनीची कमान त्यांच्या खास व्यक्ती नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवली आहे. एन चंद्रशेखर हे रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

रतन टाटा यांचा राईट हँड म्हणून ओळख, एका दिवसाचा पगार ऐकून झोप उडेल; फ्लॅटचं भाडही...
रतन टाटा यांचा राईट हँड कोण ?
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 1:55 PM

रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. टाटा कंपनी त्यांच्यासाठी अतिशय खास आहे. रतन टाटा यांनी आता कंपनीची कमान त्यांच्या खास व्यक्ती नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवली आहे. एन चंद्रशेखर हे रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे, त्यांचा राईट हँड मानले जातात. आजच्या घडीला एन. चंद्रशेखरन हे ज्या कंपनीचा कारभार सांभाळतात, एकेकाळी ते याच कंपनीत इंटर्नशिप करायचे. मात्र ही गोष्ट फार लोकाना माहिती नाही. रतन टाटा यांच्या त्यांच्यावर विश्वास आहे. व्यवसायाची समज, व्यवसायाचे नियोजन, कंपनीबद्दलची त्यांची ओढ यामुळे ते रतन टाटा यांच्या जवळचे आहेत.

कोण आहेत एन. चंद्रशेखरन ?

रतन टाटा यांचा राईट हँड मानले जाणारे एन. चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 मध्ये तामिळनाडूच्या एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण गरीबीरत गेले, पण त्यांनी मेहनत कमी केली नाही. ते भाऊ-बहिणींसोबत रोज ३ किमी चालून शाळेत जायचे. शालेय शिक्षणानंतर, त्यांनी कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, येथून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील रीजनल इंजीनिअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये मास्टर्स केले.

हे सुद्धा वाचा

अभ्यासात चांगली गती असल्यामुळे त्यांना कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळाला. अप्लाइड सायन्सेसमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी तिरुचिरापल्ली येथील रीजनल इंजीनिअरिंग कॉलेजमधून मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये पदवी प्राप्त केली.

सर्वात तरूण सीईओ

चंद्रशेखरन यांचा 2007 मध्ये TCS बोर्डात समावेश करण्यात आला होता. यानंतर त्यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणजेच सीओओची जबाबदारी मिळाली. ऑक्टोबर 2009 मध्ये त्यांना TCS चे CEO बनवण्यात आले. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी ते सीईओ बनले. ते कंपनीचे सर्वात तरुण सीईओ होते.

किती आहे पगार ?

चंद्रशेखरन यांच्या पत्नीचे नाव ललिता असून त्यांच्या मुलाचे नाव प्रणव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये चंद्रशेखरन यांचा पगार वार्षिक 65 कोटी रुपये होता. 2021-22 मध्ये तो वाढवून 109 कोटी रुपये करण्यात आला. 2020 मध्ये, त्यांनी मुंबईच्या पेडर रोडवर 98 कोटी रुपयांना डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला.

कंपनीला मोठ्या उंचीवर पोहोचवले

चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा नफा 2022 मध्ये 64267 कोटी रुपयांवर पोहोचला होता. 2017 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा नफा 36728 कोटी रुपये होता. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील 5 वर्षांमध्ये टाटा समूहाचा महसूल 6.37 लाख कोटी रुपयांवरून 9.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

फिटनेसही कमाल

एन चंद्रशेखरन फिटनेसच्या बाबतीही सजग आहेत. ते कधीच आपला दिनक्रम मोडत नाहीत. ऑफिसच्या कामासाठी कितीही उशीर झाला तरी ते रोज पहाटे 4 वाजता उठून पळायला जातात. ते मॅरेथॉन धावपटू आहेत. मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ते जगभर फिरले आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.