AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रतन टाटांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या शांतनूचा पगार किती? तुमचं वर्षाचं पॅकेजही नसेल एवढा…

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात टाटा ग्रुपचं नाव एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत एक मुलगा सावलीसारखा सोबत असतो. शांतनु नायडू आणि रतन टाटांची भेट कशी झाली ? त्याचं नेटवर्थ किती आहे ? चला जाणून घेऊया.

रतन टाटांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या शांतनूचा पगार किती? तुमचं वर्षाचं पॅकेजही नसेल एवढा...
रतन टाटा आणि शांतनू नायडू
| Updated on: Mar 30, 2024 | 2:57 PM
Share

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात टाटा ग्रुपचं नाव एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे आता 86 वर्षांचे झाले आहेत. मात्र या वयातही ते त्यांची सर्व कामं स्वत:ची स्वत: करतात. ‘टाटा ग्रुप’ला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांनी लग्नही केले नाही. पण वयाच्या या टप्प्यावर जेव्हा त्यांना जवळच्या व्यक्तीची गरज भासते तेव्हा त्यांना जवळचे असे कोणीच दिसत नाही. त्यांचा जिमी नवल टाटा, नावाचा सावत्र भाऊ आहे, ते देखील 85 वर्षांचे असून अविवाहित आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून रतन टाटा यांच्यासोबत एक तरूण मुलगा सतत दिसतो. आज आपण त्याच्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

गेल्या काही वर्षांपासून रतन टाटा यांच्यासोबत सतत सावलीसारखा दिसणारा हा तरूण आहे शांतनु नायडू. तो टाटा यांचा पर्सनल असिस्टंट आहे. दिवस असो वा रात्र, कोणताही कार्यक्रम असो शांतनु हा नेहमीच टाटा यांच्यासोबत दिसतो.

गेल्या वर्षी रतन टाटा यांनी त्यांचा वाढदिवसही शंतनु याच्यासोबत साजरा केला. शांतनु सतत सावलीसारखा त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे रतन टाटाही त्याला मुलाप्रमाणेच मानतात. टाटा समूहासोबत काम करणारे शांतनु हा रतन टाटांच्या व्यवसायासोबतच त्यांची गुंतवणूक पाहतो.

कोण आहे शांतनु नायडू ?

मूळचा पु्ण्याचा असलेल्या शांतनुचा 1993 साली झाला. तो इंजिनिअर, बिझनेसमन, लेखक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे. त्याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. 2018 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो भारतात परत आल्यानंतर तो Tata Trusts च्या चेअरमनच्या ऑफीसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करू लागला. टाटा ग्रुपमध्ये काम करणारी त्याची ही पाचवी पिढी आहे. त्याच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी याआधी टाटा ग्रुपमध्ये काम केलंय.

रतन टाटांशी अशी झाली ओळख

खरंतर शंतनु याचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. एकदा शांतनु नायडू आपल्या एनजीओच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांसाठी काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याने रस्त्यावरील बेवारस कुत्र्याला अपघातापासून वाचवण्यासाठी त्यांच्या गळ्यात चमकणारा पट्टा घालण्याचे कॅम्पेन चालवले होते. भटक्या कुत्र्यांसाठी त्याने केलेल्या कामामुळे रतन टाटा खूप प्रभावित झाले आणि त्यांनी शांतनूला आपला असिस्टंट बनण्याची ऑफर दिली. रतन टाटा यांचंही कुत्र्यांवर खूप प्रेम आहे.

शांतनूची सॅलरी किती

शांतनू याचा महिन्याचा पगार लाखोंमध्ये आहे आणि त्याच नेटवर्थ कोट्यवधींमध्ये आहे. त्याला महिन्याला जवळपास 7 लाख रुपये पगार मिळतो. सध्या त्याचे नेटवर्थ 6 कोटींच्या आसपास आहे.

तसेच शांतनूची गुडफेलोज ही कंपनी आहे. तो या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्याच काम ही कंपनी करते. या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे.

BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.