आर्थिक वर्षाचे 31 डिसेंबरशी का आहे वाकडे? 31 मार्च रोजीच का बरं संपते

| Updated on: Mar 29, 2024 | 3:15 PM

Financial Year : प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदा पण 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपेल. त्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये कामं उरकविण्याची, उद्दिष्ट साध्य करण्याची कोण घाई झाली आहे. पण कॅलेंडरप्रमाणे तर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वर्ष संपते. मग हे आर्थिक वर्ष मधातच कसं संपतं? असा अनेकांना प्रश्न पडतो. काय आहेत त्यामागील कारणं?

आर्थिक वर्षाचे 31 डिसेंबरशी का आहे वाकडे? 31 मार्च रोजीच का बरं संपते
आर्थिक वर्षाचा सुटला का तुमचा पेच?
Follow us on

सालाबादाप्रमाणे यंदा पण 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार आहे. FY 2023-24 संपण्यासाठी आता अवघे बोटावर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयापासून ते बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांत, खासगी कंपन्यांमध्ये उद्दिष्ट पूर्तीची एकदम घाई उडालेली आहे. कर नियोजन, कर भरणा याची पण गडबड झाली आहे. कॅलेंडरप्रमाणे डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना असतो, मग मधेच 31 मार्च कुठून डोकावतो, असा अनेकांना प्रश्न पडतो. हे आर्थिक वर्ष काय आणि ते 1 एप्रिलपासून सुरु होण्याची कारणं काय?

वर्षाचे आर्थिक चक्र कायम

आता 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई, उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. पण फायनेन्शिअल सायकल कित्येक वर्षांपासून आजही कायम आहे. आता दोन प्रकारच्या कर प्रणाली भारतात लागू झाल्या आहेत. एक जुनी तर एक नवीन कर प्रणाली आता लागू असली तरी तुम्ही पर्याय निवडला नाही तर आपोआप नवीन कर प्रणाली लागू होते. जुन्या कर प्रणालीत 2.5 लाख रुपयांपर्यंत तर नवीन कर प्रणालीनुसार 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नवर कर द्यावा लागत नाही.

हे सुद्धा वाचा

आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून का?

  1. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करण्याचा नियम ब्रिटिश कालीन आहे. हा नियम ब्रिटिशांसाठी सोयीचा होता. त्यामुळे त्यांनी आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून लागू केले. देश स्वतंत्र झाला तरी या सायकलमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. राज्य घटनेत पण आर्थिक वर्षाचा कालावधी मार्च-एप्रिल असाच ठेवण्यात आला आहे.
  2. भारत एक कृषी प्रधान देश आहे. पीकांचे चक्र पाहता 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते तर 1 एप्रिलपासून ते सुरु होते. यावेळी नवीन पिकासाठी जमिनीची मशागत केली जाते. तर शेतकरी मागील पिकाची कापणी करतो. धान्य बाजारात विक्री करतो. त्यातून त्याच्या गाठीशी काही तर रक्कम शिल्लक राहते. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर शेतकरी नवीन हंगामाची सुरुवात करतो.
  3. अनेकांच्या मनात हा प्रश्न कायम असतो की मग डिसेंबर महिन्यात आर्थिक वर्ष संपण्यासाठी अडचण तरी काय आहे? ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशात सण, विविध उत्सवाची एकच धांदल उडालेली असते. या काळात प्रत्येकाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असते. खरेदीची एकच लगबग उडालेली असते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात या काळात आर्थिक वर्ष संपविणे अशक्य आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आर्थिक वर्ष संपत नाही, कॅलेंडरप्रमाणे हा शेवटचा महिना मात्र असतो.
  4. तज्ज्ञांच्या मते, सर्वात महत्वाचे कारण म्हणजे 1 एप्रिलपासून हिंदू नव वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हे त्याचे प्रतिक आहे. मराठी लोकांचे नवीन वर्ष या महिन्यापासून सुरु होते. अर्थात राज्य घटनेत एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष ठरवण्यामागे कोणतेही कारण पुढे आलेले नाही.